Fatty liver: लिव्हरवर चरबी जमा होऊन सूज आलीये? आयुर्वेदानुसार हे 5 उपाय केल्याने यकृत होईल ठणठणीत बरं

Fatty liver symptoms: फॅटी लिव्हर आणि लिव्हरच्या सूजेची संभाव्य लक्षणे कोणती? पुनर्नवा, भुईआवळा, योगासने आणि योग्य आहार लिव्हरच्या आरोग्यासाठी कसा उपयोगी ठरू शकतो, तसेच कोणते पदार्थ टाळावेत याबाबत जाणून घ्या. कोणतेही हर्बल उपाय घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Fatty liver symptoms
Fatty liver symptomssaam tv
Published On: 

चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव, जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाणं तसंच मद्यपानाच्या सवयींचा परिणाम आपल्या लिव्हरच्या आरोग्यावर होऊ शकतो. यामुळे फॅटी लिव्हर आणि लिव्हरला सूज येण्याचा धोका वाढू शकतो. शरीरातील अनेक महत्त्वाची कामं सुरळीतपणे पार पाडण्यासाठी लिव्हर खूप महत्त्वाचं असतं.

लिव्हर पचनाशी संबंधित कामांमध्ये मदत करते. शरीराला मिळणाऱ्या पोषक घटकांचा वापर, रक्तातील साखर आणि शरीरातील चरबीचं नियंत्रण यासह अनेक प्रक्रियांमध्ये लिव्हरची भूमिका असते. शरीरात तयार होणारे काही टाकाऊ पदार्थ बाहेर काढण्याच्या प्रक्रियेतही लिव्हर मदत करतं. लिव्हरच्या आरोग्यावर परिणाम झाल्यास काही लोकांमध्ये थकवा, भूक कमी होणं, पोटात अस्वस्थ वाटणं यांसारखी लक्षणं दिसू शकतात.

एका वेबसाईटला माहिती देताना आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. रूपाली जैन यांच्या मते, लिव्हरला सूज आली असेल किंवा फॅटी लिव्हरची समस्या असेल तर शरीर काही संकेत देऊ शकते. अशावेळी आहार आणि जीवनशैलीमध्ये योग्य बदल करणं गरजेचं आहे. लिव्हरच्या आरोग्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, याबाबत त्यांनी काही उपाय सांगितलेत.

लिव्हरची समस्या असल्यास कोणती लक्षणं दिसू शकतात?

लिव्हरच्या आरोग्यात काही बिघाड झाल्यास शरीरात काही बदल जाणवू शकतात. यामध्ये भूक कमी होणं, पोट फुगणं, मळमळ, उलटीसारखे वाटणं, हलका ताप, अंगदुखी, शरीरावर सूज येणं, पोटात दुखणं किंवा अस्वस्थ वाटणं, रक्ताची कमतरता, जास्त थकवा आणि लघवीचा रंग पिवळा होणे यांचा समावेश होतो.

लिव्हरसाठी पुनर्नवाचा काढा

डॉ. रूपाली जैन यांच्या मते, पुनर्नवा ही आयुर्वेदात वापरली जाणारी वनस्पती आहे. लिव्हर, हृदय आणि किडनीच्या आरोग्यासाठी ती उपयुक्त असल्याचे आयुर्वेदात सांगितलंय. शरीरातील काही टाकाऊ पदार्थ लघवीद्वारे बाहेर टाकण्यास आणि सूज कमी करण्यास पुनर्नवा मदत करू शकते.

पुनर्नवाचा काढा तयार करण्यासाठी दोन कप पाण्यात सुमारे अर्धा चमचा पुनर्नवा चूर्ण घालून ते उकळावं. त्यात मुलेठीचं चूर्ण, थोडं आलं आणि पुदिन्याची पानं घालू शकता. आलं पचनक्रिया सुधारण्यास मदत करू शकतं. हे मिश्रण उकळल्यानंतर त्यात थोडा लिंबाचा रस घालून सेवन करता येते.

Fatty liver symptoms
Heart Attack : 'हे' ४ पदार्थ रक्तवाहिन्या ब्लॉक करतात, हार्ट अटॅकचा धोका वाढवतात; आजपासूनच खाणे टाळा

पुनर्नवा काढा किती वेळा प्यावा?

पुनर्नवा काढाा सकाळी रिकाम्या पोटी घेण्याचा सल्ला दिला जातो. साधारण 15 ते 20 दिवस याचं सेवन करून त्यानंतर काही काळ अंतर ठेवावं. मात्र कोणतेही आयुर्वेदिक किंवा हर्बल मिश्रण नियमितपणे घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

भुईआवळ्याची टी ठरू शकते उपयोगी

लिव्हरच्या आरोग्यासाठी भुईआवळ्याचाही वापर केला जातो. आयुर्वेदात पचनाशी संबंधित समस्या, गॅस, पोट फुगणं आणि जास्त तहान लागणं यांसारख्या त्रासांमध्ये भुईआवळा उपयोगी असल्याचं सांगितलं जातं.

लिव्हरच्या आरोग्यासाठी योगासन करा

लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी आहारासोबत शारीरिक हालचालही महत्त्वाची आहे. यासाठी दररोज काही योगासनं करता येऊ शकतात. पश्चिमोत्तानासन, अर्ध मत्स्येंद्रासन, मंडूकासन आणि पवनमुक्तासन यांसारखी योगासने करण्याचा सल्ला दिला जातो. या आसनांमध्ये पोटाच्या भागावर आणि शरीरातील काही अवयवांवर ताण येतो. त्यामुळे लिव्हरला चालना मिळण्यास, रक्ताभिसरण आणि शरीरातील चयापचयाची प्रक्रिया सुधारण्यास मदत होऊ शकते.

Fatty liver symptoms
High cholesterol: हाय कोलेस्ट्रॉल शरीरात वाढतंय? डोळ्यांपासून पायांपर्यंत दिसणारे हे 7 संकेत अजिबात दुर्लक्षित करू नका

लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी आहाराकडे लक्ष द्या

लिव्हर निरोगी ठेवायचं असेल तर रोजच्या आहाराकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. शक्यतो घरचं आणि सहज पचणारं अन्न खाल्लं पाहिजे. आहारात मूग आणि मसूर डाळींचा समावेश करावा. त्याचप्रमाणे दुधी भोपळा, परवल, भोपळा, दोडका, टिंडा आणि कारलं यांसारख्या हिरव्या भाज्या खाव्यात. आवळा आणि हरड यांचाही आहारात समावेश करता येतो.

'या' पदार्थांपासून अंतर ठेवा

लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी फक्त काय खायचं हेच नाही तर काय टाळायचं याकडेही लक्ष देणं महत्त्वाचं आहे. खूप तिखट, आंबट आणि खारट पदार्थ कमी खावेत. जास्त साखर असलेले पदार्थ, पचायला जड पदार्थ आणि गरजेपेक्षा जास्त कॅलरी असलेले पदार्थही कमी करावेत. खूप जास्त फळांचा रस, शेक आणि इतर द्रव पदार्थ घेणंही टाळावं.

Fatty liver symptoms
Heart disease: जॅम-च्युइंग गम खाताय? मग सावधान! ‘या’ स्वीटनरमुळे हार्ट अटॅक-स्ट्रोकचा धोका?

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com