Hand Dryer Side Effect: मॉल, ऑफिसमधील हँड ड्रायर तुम्हाला पाडतोय आजारी; वापरण्यापूर्वी या गोष्टी जाणून घ्याच

Sickness from hand dryers : सार्वजनिक ठिकाणी, जसे की मॉल्स, ऑफिसेस आणि एअरपोर्टवरील वॉशरूममध्ये, हँड ड्रायरचा वापर खूप सामान्य झाला आहे. पण अनेक संशोधनांमध्ये असे दिसून आले आहे की, हे हँड ड्रायर तुम्हाला आजारी पाडू शकतात आणि रोगराईचा प्रसार करू शकतात.
Hand Dryer Side Effect
Hand Dryer Side Effectsaam tv
Published On

तुम्ही कधी मॉल, ऑफिस किंवा हॉटेलमध्ये वॉशरूममध्ये गेल्यावर हात धुतल्यानंतर हँड ड्रायरचा वापर केलाच असेल. या हँड ड्रायरच्या खाली हात धरला की गरम हवा येते आणि हात सुकवतात. या गरम हवेमुळे काही सेकंदात हात सुकतात. आपल्याला हे अगदी सोयीचं वाटतं.

मात्र तुम्ही कधी विचार केलाय का ही गरम हवा खरंच तुमच्या आरोग्यासाठी सुरक्षित आहे का? फक्त बाहेरून स्वच्छ वाटणारे हे हात प्रत्यक्षात अदृश्य बॅक्टेरियाने भरलेले असतात हे तुम्हाला माहितीये का?

हँड ड्रायर आणि बॅक्टेरिया

जेव्हा तुम्ही हँड ड्रायरचा वापर करता तेव्हा गरम हवा तुमचे हात सुकवते. पण त्याचवेळी ती हवा वॉशरूममधील हवेत फिरणारे बॅक्टेरिया पुन्हा तुमच्या हातावर येतात. संशोधनात हे दिसून आलंय की, टिश्यू पेपरने हात पुसल्यावर जितके जीवाणू हातावर राहतात त्यापेक्षा कितीतरी जास्त जीवाणू हँड ड्रायर वापरल्यावर हातांवर उरतात.

Hand Dryer Side Effect
Heart attack sleep: हार्ट अटॅक झोपेत असतानाच का येतो? 'या' चुका टाळून जीव वाचवा

कोणत्या आजारांचा धोका वाढतो?

त्वचेशी संबंधित त्रास

वारंवार याचा वापर केल्याने बॅक्टेरियामुळे काही लोकांना हातावर खाज, लालसरपणा, किंवा पुरळ येऊ शकतात. ज्यांची त्वचा संवेदनशील असते त्यांना हे अधिक त्रासदायक ठरू शकतं.

पोटाचे विकार

जर हातावरील बॅक्टेरिया कण हातावरून खाण्यात गेले, तर उल्टी, जुलाब किंवा पोटदुखी होण्याची शक्यता असते. विशेषतः मुलांमध्ये ही शक्यता अधिक असते.

श्वसनाच्या समस्या

हँड ड्रायरमधून बाहेर येणाऱ्या हवेमध्ये धूळ-कण आणि बॅक्टेरिया मिसळतात. जे आसपासच्या हवेमध्ये पसरतात. यामुळे अस्थमा किंवा एलर्जी असलेल्या लोकांना त्यामुळे त्रास होतो.

व्हायरल इन्फेक्शन

वॉशरूमसारख्या बंद जागांमध्ये हवेच्या माध्यमातून व्हायरस पटकन पसरतात. हँड ड्रायर हे व्हायरस अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माध्यम बनतं.

Hand Dryer Side Effect
Bone cancer symptoms : हाडांचा कॅन्सर झाल्यावर शरीरात होतात ४ मोठे बदल; दुर्लक्ष करणं पडेल महागात

गरजेपेक्षा जास्त वापर का घातक?

हँड ड्रायरची गरम हवा तुमच्या त्वचेतील नैसर्गिक ओलसरपणा कमी करतं. परिणामी यामुळे हात कोरडे होऊ शकतात. शिवाय, टिश्यूपेक्षा हातांवर अधिक बॅक्टेरिया राहतात. दीर्घकाळ अशा यंत्रांचा वापर केल्यास शरीराच्या प्रतिकारशक्तीवरही परिणाम होतो, असंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

Hand Dryer Side Effect
Inflamed heart symptoms: हृदयाला सूज आल्यावर शरीरात दिसतात हे मोठे बदल; लक्षणं दिसताच डॉक्टरांकडे धाव घ्या

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com