महिलांचे सौंदर्य त्यांच्या केसांवर अवलंबून असते असं म्हणतात. केसांची काळजी घेणे खुप कठीण टास्क मानला जातो. अनेकदा महिला त्याच्या त्वचा आणि केसांच्या सौंदर्यासाठी हजारो रुपये खर्च करतात. आजकालच्या बदलत्या जीवनशैलामुळे केसांकडे फारसे लक्ष देता येत नाही. अनेक स्त्रीयांना सरळ, लांब आणि सिल्की केस असावे असं वाटतं. काही महिलांचे केस नैसर्गिक रित्या लांब आणि सरळ असतात. मात्र, काही महिला पार्लरमध्ये हेअर स्ट्रेटनिंग ट्रिटमेंट घेऊन केस सरळ करतात.
धूळ, माती आणि प्रदूशनामुळे केसांवर चमक राहात नाही आणि ते निर्जीव दिसू लागतात. केसांना चमकदार आणि सरळ करण्यासाठी त्यांच्यावर केराटीन केली जाते. आजकाल पार्लरमद्ये जाऊन केराटीन ट्रिटमेंट घेणे सामान्य झाले आहे. पण, केराटीन ट्रिटमेंट तुमच्या जीवीसाठी धोकादायक ठरू शकते. केराटीन ट्रिटमेंट केल्यामुले तुम्हाला किडणी संबंधीत आजार होण्याची शक्यता तज्ञांकडून दिली जाते. माहितीनुसार, केराटीन क्रिममध्ये ग्लायऑक्सिलिक अॅसिड मिसळले जाते ज्यामुळे तुच्या शरीराला हानि होण्याची शक्यता असते.
केराटीन क्रिममध्ये वापरले जाणारे ग्लायऑक्सिलिक अॅसिड जेव्हा तुमच्या केसांच्या संपर्कात येते तेव्हा ते ऑक्सलेट क्रिस्टल्समध्ये बदलते. या क्रिस्टल्सचा तुमच्या शरीरावर गंभीर परिणाम होऊ सकतो. त्यासोबतच तुम्हाला मूत्रपिंडाचा धोका वाढू शकतो. जेव्हा केराटीन ट्रिटमेंट सुरु केली होती त्यावेळी त्या प्रोडक्ट्समध्ये फॉर्मल्डिहाइड नावाचे घटक वापरले होते. या घटकामुळे केस, डोळे आणि त्वचेवर त्याचे विपरीत परिणाम दिसू लागले. त्यानंतर केराटीन प्रडक्ट्समध्ये फॉर्मल्डिहाइडची जागा ग्लायकोलिक ऍसिडचा वापर केला गेला. अनेक लोकांना वाटतं केराटिन केराटिने ट्रिटमेंटमुळे शरीराला कोणतेही नुकसान होत नाही पण केराटीन प्रोडक्ट्समध्ये वापरला जाणारा ग्लायकोलिक ऍसिड शरीरासाठी धोकादायक ठरतो. माहितीनुसार जेव्हा ग्लायकोलिक अॅसिडचे चयापचय होते तेव्हा ते ऑक्सलेट बनते. या घटकामुळे तुमची किडनी खराब होते.
घरच्या घरी केस चमकदार बनवण्यासाठी केसांना नियमित पणे खोबरेल तेल किंवा बदामाचे तेल लावा. त्यानंतर केसांवर मसाज द्या. मसाज दिल्यामुले केस लांब आणि घणदाट होतात. तेल लावल्यानंतर ३ तांसानी माईल्ड शँपू आणि त्यानंतर कंडिशनर वापरुन केस धूवा. केस धूतल्यानंतर त्याना टवेल ड्राय करा. जेव्हा केस थोडे ओले असतील त्यावेळी त्यांच्यावर सीरम लावा ज्यामुळे केसांमध्ये जटा होत नाहीत आणि केस गळणे कमी होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.