Gossip: गॉसिप करणं फायद्याचं की तोट्याचं? रीसर्चमधील निष्कर्ष एकदा वाचाच!

gossip positive psychology research: अनेकदा गॉसिपला नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले जाते. मात्र वैज्ञानिकांच्या संशोधनानुसार, गॉसिपचे काही सकारात्मक परिणाम देखील आहेत. गॉसिपमुळे समाजातील संबंध मजबूत होतात, संवाद सुधारतो आणि मानसिक आरोग्यावरही चांगला परिणाम होतो.
gossip positive psychology research
gossip positive psychology researchsaam tv
Published On

गॉसिप...जवळपास गॉसिप करायला हे सर्वांना आवडतं...अगदी शाळेत, कॉलेजमध्ये किंवा ऑफिसमध्ये देखील गॉसिप केलं जातं. तुम्हाला आवडो वा न आवडो, गॉसिप रोजच्या आयुष्याचा भाग बनलंय. इतर लोकांबद्दल आणि त्यांच्या गोष्टींबद्दल बेफिकीरपणे किंवा दुष्ट हेतूने बोलणं हे जवळजवळ दैनंदिन जीवनाचा भाग आहे.

लोक दररोज साधारणपणे एक तास गॉसिप करण्यात घालवतात, असं फेब्रुवारी 2024 मध्ये Proceedings of the National Academy of Sciences (PNAS) या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात स्पष्ट झालंय. Explaining the Evolution of Gossip या अहवालात गॉसिप कसं सुरु झालं आणि ते कसं उपयुक्त ठरतं याचे स्पष्टीकरण देण्यात आलंय.

gossip positive psychology research
Heart disease risk: छातीत दुखेपर्यंत वाट पाहू नका...! ताण-जीवनशैलीचा तरूणांच्या हृदयावर कसा होतो परिणाम, तज्ज्ञांनी सांगितली कारणं

“गॉसिप हे लोकांच्या संवादाचं एक वैशिष्ट्य आहे” असं मानसशास्त्रज्ञ आणि मनोचिकित्सक बार्बरा झोरिल्ला सांगतात. ते सांगतात की, “सामाजिक मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून गॉसिप सामाजिक नियमांना बळकटी देतं.

मानसशास्त्रज्ञ सिल्व्हिया मन्जावाकास यांनी सांगितलं की, गॉसिपमुळे आपल्याला एका ग्रुपचा भाग असल्याची भावना होते. हे नातेसंबंध नियंत्रित करण्याचं साधन आहे. ज्यामुळे आपल्याला आपलेपणाची जाणीव होते आणि तणावही कमी होतो. गॉसिप हे चांगलंही असतं. जोपर्यंत त्यामागे दुसऱ्याला दुखावण्याचा हेतू नसतो.

gossip positive psychology research
Hair Fall Problem: मासिक पाळीच्या वेळी केस खूप गळतात? तज्ज्ञांनी सांगितलं महत्वाचं कारण अन् जबरदस्त उपाय

गॉसिप मर्यादेच्या बाहेर कधी जातं?

जेव्हा गॉसिप दुसऱ्याविरुद्ध शस्त्र म्हणून वापरलं जातं, तेव्हा ते धोकादायक किंवा मर्यादेच्या बाहेरचं ठरतं. “जेव्हा गॉसिप इतरांना टाळण्याचं किंवा नियंत्रित करण्याचं साधन बनतं तेव्हा ते योग्य नाही. अफवांमधून निर्माण होणारे विचार अनेकदा विकृत मानले जातात.” असे मन्जावाकास सांगतात.

तुम्ही कोणासोबत करता हे महत्त्वाचं

सामान्यतः लोक गॉसिपचा आनंद घेतात. ते मजेदार असतं, आनंद देतं. खरं तर, गॉसिप करताना सर्वात महत्त्वाचा विचार म्हणजे तुम्ही कोणासोबत गॉसिप करता. Nature Human Behavior या जर्नलमध्ये जुलै 2024 मध्ये प्रकाशित झालेल्या How Information on Networks Facilitates Strategic Gossip या अभ्यासानुसार, माणसं सहजपणे कोणासोबत गॉसिप करावं हे ठरवू शकतात.

gossip positive psychology research
Child sleep science: थंडीमध्येही रात्री झोपेत मुलं अंगावरून चादर का काढून टाकतात? डॉक्टरांनी सांगितली ५ वैज्ञानिक कारणं

गॉसिप ऐकणाऱ्याचीही जबाबदारी

गॉसिप ऐकणारी व्यक्तीही ते पसरवण्यासाठी जबाबदार असते. मग ती कोणत्याही माध्यमातून असो. “जर आपण गॉसिप ऐकतो, तर त्याकडे जागरूकतेने आणि काळजीपूर्वक पाहिलं पाहिजे” आपण जे खरं नाही ते पसरवू नये, किंवा गॉसिपवर कृती करू नये. योग्य गोष्ट म्हणजे संबंधित व्यक्तीशी बोलणं आणि संदर्भ समजून घेणं महत्त्वाचं आहे. “गॉसिप हे चुकीचं नाही. महत्त्वाचं म्हणजे आपण त्यावर काय रिएक्शन देतो हे महत्त्वाचं आहे, असं मन्जावाकास सांगतात.

gossip positive psychology research
Babies constipation: थंडी वाढली की बाळांना का होतं कॉन्स्टिपेशन? तज्ज्ञांनी सांगितली कारणं आणि सोपे उपाय

गप्पा आणि गॉसिप यामधील सीमारेषा

गप्पा मारणं म्हणजे आपले विचार, भावना, अनुभव आणि कल्पना इतरांसोबत व्यक्त करणं. जर नकारात्मक हेतू नसेल आणि गॉसिप योग्य असेल, तर त्याला दुष्ट भावना म्हणता येणार नाही. ते फक्त गॉसिप आहे,” असे मन्जावाकास सांगतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com