Google चा युजर्सना झटका! १७ अॅप्स घातली बंदी, कारण काय?

SpyLoan apps : बुधवारी झालेल्या रिचर्सनुसार त्यांना १८ अॅप्सपैकी १७ अँड्रॉइड लोन अॅप्स मिळाले आहेत जे युजर्सच्या डेटाला हॅक करतात. गुगलने भारतासह इतर अनेक देशातील युजर्सना टार्गेट करणारे १७ अॅप्सवर बंदी घातली आहे.
Google Play Store
Google Play StoreSaam Tv
Published On

Google Remove 17 Apps in Play Store :

Google आपल्या ग्राहकांना वेळोवेळी सुविधा पुरवत असते. कंपनी आपल्या युजर्सच्या संरक्षणासाठी सतत प्रयत्न करत असते. यासाठी कंपनीने आपल्या प्ले स्टोअरवरुन १७ अॅप्स काढून टाकले आहेत.

बुधवारी झालेल्या रिचर्सनुसार त्यांना १८ अॅप्सपैकी १७ अँड्रॉइड लोन अॅप्स मिळाले आहेत जे युजर्सच्या डेटाला हॅक करतात. गुगलने (Google) भारतासह (India) इतर अनेक देशातील युजर्सना टार्गेट करणारे १७ अॅप्सवर बंदी घातली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. अहवालात मिळाली माहिती

ESET संशोधन अहवालानुसार, या अॅप्सना काढून टाकण्यापूर्वी Google Play वरुन जगभरात १ कोटीहून अधिक डाउन केले गेले होते. अशा फसव्या अँड्रॉइड लोन अॅप्सना स्पायलोन अॅप्स असे नाव देण्यात आले आहे.

Google Play Store
Phone हरवलाय? Phone Pe, Google Pay आणि Paytm UPI ID कसे कराल ब्लॉक? वाचा एका क्लिकवर

या अॅप्सच्या माध्यमातून युजर्सची वैयक्तिक माहिती चोरीला जात होती तसेच तंत्रज्ञानाचा वापर करुन फोन हॅक केला जात होता.

या अॅप्सच्या माध्यमातून आफ्रिका, लॅटिन अमेरिका आणि दक्षिणपूर्व आशियामधील युजर्सना टार्गेट करत होते. सिक्युरिटी कंपनीने सांगितले की, यापूर्वी त्यांनी १८ अॅप्सपैकी सर्च जायंटने १७ अॅप्स काढून टाकले आहेत. परंतु, जर हे अॅप्स तुमच्या फोनमध्ये (Phone) आजही असेल तर युजर्सना ते हटवावे लागेल.

Google Play Store
Mobile Recharge: Google Pay वरुन रिचार्ज करताय? मोजावे लागतील अधिक पैसे, कारण काय?

AA Kredit, Amor Cash, GuayabaCash, EasyCredit, Cashwow, CrediBus, FlashLoan, PréstamosCrédito, Préstamos De Crédito-YumiCash, Go Crédito, Instantáneo Préstamo, Cartera grande, Rápido Crédito, Finupp Lending, 4S Cash, TrueNaira, EasyCash या अॅप्सवर गुगलने बंदी घातली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com