Phone हरवलाय? Phone Pe, Google Pay आणि Paytm UPI ID कसे कराल ब्लॉक? वाचा एका क्लिकवर

Tricks And Tips Phone Lost : तुमचा फोन हरवल्यानंतर तुम्हाला अधिक प्रमाणात नुकसानाला सामोरे देखील जावे लागते. तसेच बँक फसवणूकीच्या देखील अनेक घटना समोर येतात. अशावेळी फोन हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास आपला युपीआय आयडी कसा ब्लॉक कराल? अशावेळी काय करायला हवे? जाणून घेऊया सविस्तर
How To Block UPI ID
How To Block UPI IDSaam Tv
Published On

How To Block UPI ID :

सध्याच्या ऑनलाइन युगात फोन पे, गुगल पे आणि पेटीएम सारख्या युपीआय आयडीचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. ऑनलाइन शॉपिंग असो किंवा किराणाचे सामान असो. हल्ली प्रत्येक ठिकाणी स्कॅन करुन ऑनलाइन पेमेंट केले जाते.

परंतु, तुमचा फोन हरवल्यानंतर तुम्हाला अधिक प्रमाणात नुकसानाला सामोरे देखील जावे लागते. तसेच बँक फसवणूकीच्या देखील अनेक घटना समोर येतात. अशावेळी फोन हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास आपला युपीआय आयडी कसा ब्लॉक कराल? अशावेळी काय करायला हवे? जाणून घेऊया सविस्तर ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. Paytm UPI ID कसा ब्लॉक कराल?

  • सर्वात आधी फोन चोरीला गेल्यानंतर पोलिस तक्रार करा.

  • त्यानंतर तुमचे ज्या बँकेत खाते आहे त्यावर किंवा पेटीएम बँकेच्या हेल्पलाइन नंबरवर कॉल करा.

  • यानंतर Lost Phone हा पर्याय निवडा.

  • त्यात तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील. त्याची उत्तर देऊन तुमचा मोबाइल क्रमांक टाका.

  • यानंतर सगळीकडून लॉग आउट पर्याय निवडा.

  • नंतर पेटीएमच्या वेबसाइटवर जाऊन रिपोर्ट अ फ्रॉड हा पर्याय निवडा.

  • यात तुम्हाला पोलिस अहवालासह काही तपशील द्यावे लागतील. त्यानंतर तुमचे पेटीएम खाते तात्पुरते बंद केले जाईल.

How To Block UPI ID
WhatsApp Account Banned : भारतात व्हॉट्सअ‍ॅपचे ७५ लाख अकाउंट्स बॅन, तुमचा नंबर यात आहे का?

2. Google Pay UPI आयडी कसा ब्लॉक करायचा?

  • फोन (Phone) चोरीला गेल्यानंतर सर्वात आधी कोणत्याही फोनवरुन 18004190157 हा नंबर डायल करा.

  • यानंतर युजर्सना पेटीएम खाते ब्लॉक करण्याबाबत माहिती द्यावी लागेल.

  • Android युजर्सना फोनवर किंवा लॅपटॉपवर (Laptop) Google Find My Funo वर लॉग इन करावे लागेल. यानंतर Google Pay चा सर्व डेटा डिलिट करावा लागेल. यानंतर तुमचे Google Pay अकाउंट काही काळापुरता ब्लॉक केले जाईल.

  • तुम्ही iOS युजर्स असल्यास Find My app किंवा Apple च्या टूल्सद्वारे सर्व डेटा डिलिट करुन गुगल पे खाते ब्लॉक करु शकता.

3. Phone Pay UPI ID कसा ब्लॉक कराल?

  • यासाठी तुम्हाला सर्वात आधी ज्या फोनसोबत युपीआय आयडी लिंक आहे त्याविरुद्ध तक्रार दाखल करा.

  • त्यानंतर 02268727374 किंवा 08068727374 वर कॉल करा.

  • OTP मागितल्यानंतर तुम्हाला सिम कार्ड आणि डिव्हाइस हरवले आहे या पर्यायवर क्लिक करावे लागेल.

  • यानंतर तुम्ही कस्टमर केअरशी कनेक्ट व्हाल, ज्यामुळे तुम्हाला UPI ID ब्लॉक करता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com