WhatsApp Account Banned : भारतात व्हॉट्सअ‍ॅपचे ७५ लाख अकाउंट्स बॅन, तुमचा नंबर यात आहे का?

Why WhatsApp Account Ban : नवीन आयटी कायद्यानुसार व्हॉट्सअॅप अकाउंटवर बंदी घालण्यात आली आहे. मेटाने तयार केलेल्या ऑक्टोबरच्या अहवालानुसार १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२३ दरम्यान भारतात एकूण ७५ लाख व्हॉट्सअॅप खाती बॅन करण्यात आली आहेत.
WhatsApp Account Banned
WhatsApp Account BannedSaam Tv
Published On

WhatsApp Account Banned News :

WhatsApp आपल्या वापरकर्त्यांसाठी सतत नवीन अपडेट आणत असते. या WhatsApp चे जाळे जगभरात असंख्य ठिकाणी पसरले आहे. यावरुन आपल्या एकमेकांशी सहज संवाद साधता येतो.

2023 च्या वर्षात WhatsApp अनेक बदल केले तसेच युजर्ससाठी नवीन अपडेटही आणले. परंतु, ऑक्टोबर महिन्यात अनेक अकाउंट मोठी कारवाई करण्यात आली. गेल्या काही वर्षात व्हॉट्सअॅपने प्रायव्हसी आणि स्पॅम मेसेज पाठवणाऱ्यांवर कडक कारवाई केले आहे. व्हॉट्सअॅपच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे मोठ्या प्रमाणात अकाउंटवर बंदी घातली आहे. यामुळे ऑक्टोबर महिन्यात व्हॉट्सअॅपने जवळपास ७५ लाख खाती बॅन केली आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नवीन आयटी कायद्यानुसार व्हॉट्सअॅप (WhatsApp) अकाउंटवर बंदी घालण्यात आली आहे. मेटाने तयार केलेल्या ऑक्टोबरच्या अहवालानुसार १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२३ दरम्यान भारतात एकूण ७५ लाख व्हॉट्सअॅप खाती बॅन (Banned) करण्यात आली आहेत. या काळात व्हॉट्सअॅपवर सुमारे ९,०६३ खात्यांबाबत तक्रारी करण्यात आल्या.

WhatsApp Account Banned
Vodafone-Idea ची धमाकेदार ऑफर! 500 रुपयांत अनिलिमेटड कॉलिंग, दिवसाला 2.5 GB डेटासह Disney+ Hotstar चे subscription फ्री

1. कोणत्या खात्यावर बंदी?

जे अकाउंट (Account) खाते स्पॅम होते त्या व्हॉट्सअॅप अकाउंटविरुद्ध तक्रार करण्यात आली होती. याचे कारण असे की, इतर युजर्सची गोपीनियता यामुळे राखण्यात येईल. तसेच या नंबरवरुन कायद्याचे उल्लंघन झाले आहे. फोटोचा किंवा व्हिडिओचा गैरवापर केला गेला आहे. किंवा अश्लील मजकुराचा पसरवण्यात आला आहे. अशा खात्यांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच ज्या नंबरवरुन खोटे किंवा फसवणारे मॅसेज येत आहेत. अशा खात्यांवरही बंदी घातली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com