Hartalika Mehandi Designs : हरितालिकेच्या दिवशी काढा 'या' सुंदर मेहंदी डिझाइन; कुणाचीच नजर पायांवरून हटणार नाही

Beautiful Alta Designs : गणेशोत्सव सुरु होण्याच्या एक दिवस आधी हरितालीका असते. त्यामुळे हरितालीकेनिमित्त तुम्ही सुंदर साजश्रृंगार करण्यासाठी पायांवर सुंदर लाल मेहंदी रेखाटू शकता.
Beautiful Alta Designs
Hartalika Mehandi DesignsSaam TV
Published On

आज सपूर्ण देशभरात हरितालिका साजरी केली जात आहे. हा दिवस साजरा करण्यासाठी प्रत्येक तरुणी साजश्रृंगार करत उपवास करते. तरुण मुली होणाऱ्या पतीसाठी आणि विवाहित महिला आपल्या पतीसाठी हा उपवास करतात.

हरितालिका साजरी करताना प्रत्येक स्त्री या दिवशी सुंदर साडी किंवा नवीन ड्रेस परिधान करते. तसेच आकर्षक दागिने परिधान करते. हातांवर पायांवर सुद्धा सुंदर मेहंदी रेखाटली जाते. आता तुम्ही सुद्धा हरितालिकेसाठी तयार होत असाल तर आम्ही तुमच्यासाठी मेहंदीच्या काही खास डिझाइन शोधल्या आहेत.

Beautiful Alta Designs
Ganesh Utsav 2022 : गणेशाेत्सव मंडळांसाठी आनंदाची बातमी; सांगलीत झाला महत्वपुर्ण निर्णय

ठिपक्यांची आलता डिझाइन

महिला सर्वाधिक ठिपक्यांची आलता डिझाइन पायांवर कोरतात. त्यासाठी सर्वात आधी लाल मेहंदी तयार करून घ्यावी लागेल.त्यानंर पायांवर संपूर्ण कडांना मेहंदी लावून घ्या. तसेच पायावर मध्यभागी एक मोठा ठिपका काढा. त्यावर आजुबाजून बारीक बारीक अन्य ठिपके काढून घ्या.

बॉर्डर डिझाइन

बॉर्डर डिझाइन प्रत्येक महिलेला सुंदर दिसते. अगदी तरुणींपासून ते वृद्ध महिलांना सुद्धा ही डिझाइन फार छान दिसते. यामध्ये पायांना तळव्यापासून थोडे वरती संपूर्ण लाल मेहंदी लावायची असते. तसेच बॉर्डरला गोल आणि बारीक डिझाइन रेखाटायची असते.

कमळाच्या फुलांची डिझाइन

तुमचे नुकतेच लग्न झाले असेल आणि लग्नानंतरची ही पहिली हरितालिका असेल तर कमळांची डिझाइन आणखी सुंदर दिसेल. तयासाठी पायांच्या बोटांना लाल मेहंदी लावून घ्या. तसेच मध्यभागी एक गोल काढून घ्या. या वर्तुळात तुम्ही सफेद रंगाचं कमळाचं फुल काढू शकता. तर पायांच्या बोटांवर सुद्धा कमळाची फुलं रेखाटू शकता.

लाल सफेद डिझाइन

पाय आणखी सुंदर दिसावेत यासाठी लाल सफेद डिझाइन सुद्धा तुम्ही बनवू शकता. पायांवर आजुबाजून लाल मेहंदी लावून घ्या. तसेच लाल मेहंदीवर तुम्ही सफेद रंगाची छान नक्षी काढू शकता. अशा डिझाइनमध्ये पाय आणखी सुंदर दिसतात.

Beautiful Alta Designs
Mumbai Ganesh Utsav 2024 : हा वीकेंड गणरायाच्या चरणी, बाप्पाच्या दर्शनाने दुःख होतील दूर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com