Shreya Maskar
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.
जगभरातील लोक मुंबईमध्ये गणपतीला येतात.
मुंबईतील परळ परिसरात असलेला लालबागचा राजा 'नवसाचा गणपती' म्हणून ओळखला जातो.
मु़ंबईचा राजा म्हणून प्रख्यात असलेला गणेश गल्लीचा गणपतीची मुंबईकर आतुरतेने वाट पाहत असतात.
मुंबईत आणखी एक आकर्षण म्हणजे गिरगावचे गणपती पाहणे.
संपूर्ण रात्रभर फिरून गिरगावच्या खेतवाडीतील गणरायाचे दर्शन घेणे एक वेगळीच मज्जा आहे.
ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा सिद्धिविनायक महागणपती मंदिरात गणेशोत्सवाला मोठी गर्दी पाहायला मिळते.
चिंचपोकळीचा चिंतामणी देखील मुंबईत प्रसिद्ध आहे.
दरवर्षी लाखो भक्त मुंबईतील 'या' प्रख्यात बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी येतात.