महाराष्ट्रात गणपतीचा उत्साहात मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. हा १० दिवसात गणपतीची पूजा आणि अर्चना केली जाते. या दिवसात बाप्पाच्या आवडीच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो.
मोदक हा बाप्पाच्या आवडीचा पदार्थ. गणेशोत्सवात गणपतीला वेगवेगळ्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. या काळात अनेक वेगवेगळे पदार्थ असतात. पण मोदक हा सगळ्यात आवडीने बनवला जाणारा पदार्थ आहे. मिठाईच्या दुकानात आपल्याला अनेक रंगाचे मोदक पाहायला मिळतात. जर तुम्ही देखील लाडक्या बाप्पासाठी मोदक बनवायच्या बेतात असतील तर ड्रायफुट्सचे मोदक ट्राय करु शकता.
2. कृती
सर्वप्रथम अंजीर दोन तास भिजत ठेवा.तसेच खजूर दोन तास भिजवा.
बदाम, शेंगदाणे, अक्रोड, पिस्ता आणि काजू ग्राइंडरमध्ये घ्या. सगळ्याची एकत्र पेस्ट तयार करुन घ्या
कढईवर शेंगदाणे घालून परतून घ्या. आता दुसऱ्या पॅनमध्ये तीळ, सुके खोबरे, खसखर घालून चांगले भाजून घ्या.
त्यानंतर भिजवलेले अंजीर आणि खजूरची पेस्ट तयार करा. कढईत तूप घेऊन त्यात अंजीर-खजूरची पेस्ट घाला.
चांगले परतून घ्या आणि त्यात बेदाणे- जर्दाळू घाला, त्यात ड्रायफ्रुट्सची पेस्ट घाला.
त्यात सुके खोबरे आणि वेलची पावडर घाला. त्यानंतर मोदका साचा घेऊन त्यात सारण भरा. तयार होतील लाडक्या बाप्पाला आवडणारे उकडीचे मोदक
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.