Which Vegetable is Good for Health : फ्रोजन की, ताज्या ? कोणत्या भाज्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Fresh Vegetable : भाज्या निवडण्यापेक्षा त्या रेडी टू कुक सारख्या मिळाल्या तर काम अगदीच सोपे होते.
Which Vegetable is Good for Health
Which Vegetable is Good for HealthSaam Tv

Frozen Vegetables VS Fresh Vegetables : बऱ्याच गृहिणींना आठवड्याभराच्या भाज्या विकत घेण्याची सवय असते. त्यात अनेक जण कामाच्या व्यापामुळे झटपट काम होईल अशा अनेक गोष्टी बघत असतात. अशातच भाज्या निवडण्यापेक्षा त्या रेडी टू कुक सारख्या मिळाल्या तर काम अगदीच सोपे होते.

परंतु, डी-मार्ट किंवा भाज्यांच्या (Vegetable) मार्केटमध्ये हल्ली आपल्याला सर्वत्र फ्रोजन भाज्या सहज पाहायला मिळतात. अनेकांना वाटते या भाज्यांचा वापर केल्यास काम सोपे होत व त्या अधिक फायदेशीर (Benefits) आहे. परंतु, थंड तापमानात या भाज्या असल्यामुळे भाज्यांमधील पोषक तत्वे नष्ट होतात. तर ताज्या भाज्यांना आपण व्यवस्थितरित्या तपासून मगच खरेदी करतो. आता प्रश्न असा पडतो की फ्रोझन भाज्यांपेक्षा ताज्या भाज्या खरोखरच जास्त पौष्टिक असतात का? जाणून घेऊया...

Which Vegetable is Good for Health
Most Expensive Vegetable : अबब ! 'या' भाजीची किंमत चक्क 85 हजार, फायदे वाचून व्हाल अवाक्

'मसाला लॅब्स: द सायन्स ऑफ इंडियन कूकिंग'चे लेखक क्रिश अशोक यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फ्रोजन आणि ताज्या भाज्यांची तुलना केली आहे आणि फ्रोजन भाज्या खाल्ल्याने आरोग्याला कोणतेही फायदे मिळत नाहीत हे मत चुकीचे सिद्ध केले आहे. ताज्या भाज्या मंडईत पोहोचण्यापूर्वी अनेक टप्प्यांतून जातात. ताज्या भाज्या अनेकदा त्या परिपूर्ण होण्याआधी कापल्या जातात.

1. कोणती भाजी जास्त पौष्टिक आहे?

जर तुमची स्वत:ची बाग असेल किंवा तुम्ही स्वत: भाजीपाला पिकवत असाल तर तुम्हाला त्याचा फायदा आहे पण जर तुम्ही बाजारातून (Market) भाजीपाला आणत असाल तर ते तितकेसे फायदेशीर ठरणार नाही. कारण या भाज्या काही दिवस जुन्या असण्याचीही शक्यता आहे. मंडईत येणारा सर्वच भाजीपाला ताजाच असेल असे नाही. ते काही दिवसांचेही असू शकतात.

Which Vegetable is Good for Health
Age Difference between Couples : बायकोपेक्षा- नवरा वयाने किती मोठा असावा ?

एका अहवालानुसार, ताजे बीन्स काही दिवसांतच उचलले जातात आणि विकले जातात. तर फ्रोजन बीन्स हे फ्लॅश-फ्रोझन होतात. स्टोरेज वेळ आणि तापमान यासारख्या घटकांमुळे पौष्टिक मूल्य निश्चितपणे कमी होते. बहुतेक प्रकरणांमध्ये, फ्रोजन सोयाबीनचे पौष्टिक मूल्य ताजे बीन्ससारखेच असते. याचे कारण असे की थंड तापमान पोषक द्रव्ये टिकवून ठेवण्यास आणि खराब होण्यास प्रतिबंध करण्यास मदत करते.

Which Vegetable is Good for Health
Weight And Height Calculate : वयानुसार किती असायला हवे आपले वजन?

2. फ्रोजन भाज्या का चांगल्या?

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अनेक बाबतीत फ्रोजन केलेल्या भाज्या ताज्या भाज्यांपेक्षा चांगला पर्याय ठरू शकतात. कारण फ्रोजन केलेल्या भाज्या पिकण्याच्या जवळ कापल्या जातात आणि लगेच गोठल्या जातात. तर दुसरीकडे ताज्या भाज्या तयार होण्यापूर्वीच कापल्या जातात आणि त्यानंतर अनेक दिवसांनी मंडई किंवा बाजारात पोहोचतात. अशा परिस्थितीत या भाज्यांमध्ये पोषक तत्वांचा ऱ्हास होतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com