Most Expensive Vegetable : अबब ! 'या' भाजीची किंमत चक्क 85 हजार, फायदे वाचून व्हाल अवाक्

ही भाजी तयार होण्यासाठी ३ वर्ष लागतात.
Most Expensive Vegetable
Most Expensive VegetableSaam Tv
Published On

Most Expensive Vegetable : भाज्यापाल्यांचे वाढते दर पाहाता सर्वसामान्यांसाठी नेहमीच चिंतेचा प्रश्न असतो. आपल्या रोजच्या जीवनातील आवश्यक असणाऱ्या खाण्यापिण्याच्या पदार्थातील एक महत्त्वाचा भाग आहे.

सध्या अशीच एक भाजीची किंमत तुम्ही ऐकली तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. परंतु या भाजीचे अनेक आरोग्यासाठी फायदे आहेत. या भाजीची किंमत 85 हजार इतकी असून त्याची लागवड करण्यासाठी अनेक वर्षे लागतात आणि गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी देखील ती अधिक प्रभावी ठरते.

Most Expensive Vegetable
Vegetable Price Hike: भाज्या कडाडल्या; महागाईने त्रस्त सर्वसामान्यांचा खिसा आणखी रिकामा होणार

1. हॉप शूट औषधांपेक्षा कमी नाही

भारतातील हिमाचल प्रदेशात या भाजीची लागवड केली जात होती, परंतु नंतर उत्पादनाच्या खर्चामुळे ती बंद करण्यात आली. त्यानंतर या भाजीची लागवड ही फक्त अमेरिका व युरोपमध्ये केली जाते.

2. भारतात या भाजीची किंमत किती ?

ही भाजी सध्या भारतात घेतली जात नाही, पण तरीही तुम्ही ती ऑनलाइन खरेदी करू शकता. भारतात एक किलो हॉप शूटची किंमत सुमारे 85 हजार रुपये आहे. तसेच खरेदी करताना याची किंमत एक लाखापर्यंत जाऊ शकते. ही भाजी सोन्यापेक्षा देखील महाग आहे.

3. किंमत इतकी जास्त का आहे?

  • ही भाजी इतकी माहग असण्याचे कारण तिची लागवड.

  • ती तयार होण्यासाठी सुमारे ३ वर्षे घेते.

  • तसेच या वनस्पतीचा वरचा हिरवा भाग नाजूक असल्याने तो तयार होईपर्यंत त्याची काळजी घ्यावी लागते.

4. हॉप शूटचे फायदे काय आहेत?

  • हे अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी वापरले जाते. काही संशोधन देखील झाले आहे, ज्यामध्ये असे आढळले आहे की हॉप शूट्स ऍन्टीबॉडीज तयार करू शकतात, ज्यामुळे शरीराला क्षयरोगाशी लढण्यास मदत होते.

  • याशिवाय, हॉप शूट्स अस्वस्थता, झोपेची समस्या, चिंता, तणाव (Stress), उत्तेजना, एडीएचडी, चिंताग्रस्तपणा आणि चिडचिड यासारख्या समस्यांपासून मुक्त होऊ शकतात.

  • इतर अनेक संशोधने असे सूचित करतात की त्यात असलेल्या ऍसिडमध्ये कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्याची क्षमता असते आणि ते रक्ताच्या कर्करोगापासून (Cancer) संरक्षण देखील करू शकतात. त्यात असे फ्लेव्होनॉइड्स आढळतात, जे अनेक प्रकारच्या कॅन्सरसाठी प्रभावी ठरू शकतात.

  • हॉप शूट्समध्ये शंकूच्या आकाराची फुले असतात ज्याला स्ट्रोबिल्स म्हणतात, जे बिअरच्या गोडपणात संतुलन राखण्यासाठी स्थिरीकरण एजंट म्हणून काम करतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com