Friday Upay: आर्थिक तंगीमुळे त्रस्त आहात? शुक्रवारी करा हे 5 उपाय, माता लक्ष्मी होईल प्रसन्न

Maa Lakshmi : तुम्हीही सतत आर्थिक तंगीमुळे त्रस्त असाल, पैसे हातात टिकत नसतील तर आज आम्ही तुम्हाला काही असे उपाय सांगणार आहोत.
Friday Upay
Friday UpaySaam Tv
Published On

Shukrvache Upay : हिंदू धर्मात माता लक्ष्मीला संपत्तीची देवी म्हटले आहे. असे म्हणतात की, एकदा का ती कोणावर प्रसन्न झाली की त्याच्या आयुष्यात कधीही संपत्ती आणि वैभवाची कमतरता भासत नाही. आठवड्यातील सातही दिवस त्यांची पूजा करण्याचा मान असला तरीही शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा सगळ्यात आवडता वार.

जर तुम्हीही सतत आर्थिक तंगीमुळे त्रस्त असाल, पैसे हातात टिकत नसतील तर आज आम्ही तुम्हाला काही असे उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही पुन्हा श्रीमंत होऊ शकता जाणून घेऊया त्याबद्दल

Friday Upay
Shukra Gochar 2023 : उलटी गिनती सुरु! या राशींवर मोठं संकट येण्याची शक्यता, सावध राहा

1. शास्त्रानुसार देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी शुक्रवारी व्रत करावे. स्नान करून माँ लक्ष्मीची पूजा करून व्रताची सुरुवात करा. सलग 21 शुक्रवारी व्रत पाळल्यानंतर माता लक्ष्मीला नैवेद्यात खीर आणि 7 मुलींना ती खाऊ घाला. या उपायाने देवी लक्ष्मी (Lakshmi) तुमच्यावर प्रसन्न होईल.

2. तुळशीच्या रोपामध्ये माता लक्ष्मी वास करते असे मानले जाते. शुक्रवारी संध्याकाळी तुळशीजवळ देशी तुपाचा दिवा लावावा. हा उपायामुळे देवी लक्ष्मीवर तुमची श्रद्धा असते. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होऊन व्यक्तीवर धनाचा (Money) वर्षाव करतात. असे केल्याने कुटुंबाची (Family) आर्थिक कोंडी दूर होते.

Friday Upay
Don't Eat Wheat For A Month : महिनाभर गव्हाचे पदार्थ खाऊच नका, शरीरात होतील हे बदल

3. पुराणानुसार, ज्या घरात ज्येष्ठ आणि महिलांचा आदर केला जातो, तेथे मां लक्ष्मी वास करते. असे म्हणतात की स्नेह आणि सहकार्याने भरलेले घर स्वर्गासारखे असते. अशा घराजवळ रोग आणि वाईट शक्ती कधीच येत नाहीत.

4. ज्या घरात स्वच्छता असते आणि आपापसात एकता असते, त्याच घरात माँ लक्ष्मीचे आगमन होते, असे धर्मात सांगितले आहे. यासाठी रोज सकाळी घराच्या मुख्य गेटच्या दोन्ही बाजूला हळद आणि कुंकू लावून स्वस्तिक बनवा. हा उपाय तुमच्या नशिबाची बंद खिडकी उघडेल.

Friday Upay
Stress And Teenagers : धक्कादायक वास्तव समोर, १० पैकी ७ तरुण तणावग्रस्त; का उचलताहेत टोकाचं पाऊल? कारणं समोर

5. ज्योतिषशास्त्रात गायीला पूजनीय म्हटले आहे. गायीच्या शरीरात ३३ कोटी म्हणजेच ३३ प्रकारच्या देवदेवता वास करतात असे मानले जाते. त्यामुळे या सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद घेण्यासाठी रोज गाईला ताजी भाकरी खाऊ घालावी. यामुळे तुमचे नशीब चमकायला वेळ लागणार नाही आणि तुमची खूप प्रगती होईल.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com