Sneezing : सतत येणाऱ्या शिंकांनी हैराण झालात? मग 'हे' उपाय एकदा करून पाहाच, मिनिटांत मिळेल आराम

Cold Home Remedies: सतत येणाऱ्या शिंकांमुळे त्रास होत असेल तर हे घरगुती उपाय जरूर करा. हळदीचे दूध, आलं-मध आणि व्हिटॅमिन सीयुक्त पदार्थ सर्दीवर रामबाण ठरतात.
Sneezing Remedies
Cold Home Remediesgoogle
Published On

सध्याच्या बदलत्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे अनेकांना बाहेरचं खाणं पसंत पडतयं. लोक खूप मेहनत करुन कष्ट करुन पैसे कमवतात पण हेल्दी खाण्याऐवजी मोठ-मोठ्या हॉटेल्समध्ये जाऊन खाण्यात उडवतात. त्याने शरीरावर होणारा परिणाम त्यांना फारसा लवकर जाणवत नाही. तर त्यांची रोगप्रतिकारक शक्तीही कमी होते. मग त्यांना वातावरणामुळे होणाऱ्या बदलांमुळे लगेचच अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं.

पुढील बातमीत आपण सर्दीवर उपाय जाणून घेणार आहोत. कारण एकदा की सर्दी झाली तर ती तुमच्या सगळ्या कामात अडथळे निर्माण करते. सतत शिंका, डोके दुखी, चिडचिड अशाही समस्यांना त्यामुळे सामोरं जावं लागतं. काहींना वातावरणाच्या बदलामुळे सर्दी होते तर काहींना धुळ मातीची अॅलर्जीमुळे. त्यामुळे नाकातून Bacteria बाहेर पडतो.

त्यालाच आपण शिंका म्हणतो. पुढे आपण यावर काही रामबाण उपाय जाणून घेणार आहोत. जे तुम्ही घरीच जास्त पैसे न घालवता करु शकता. पण जर तुम्हाला सर्दीचा त्रास बरेच दिवस असेल तर तुम्ही डॉक्टरांकडून उपचार घेणं महत्वाचं आहे.

Sneezing Remedies
Post Office SCSS: FD पेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची ज्येष्ठ नागरिकांसाठी खास योजना, दरमहा मिळतील ₹20,500

वारंवार शिंका येत असतील तर करा हे घरगुती उपाय

1) हळदीचे दूध

हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. रात्री झोपण्यापूर्वी गरम हळदीचे दूध घेतल्याने सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो. यामुळे इन्फेक्शन कमी होऊन वारंवार येणाऱ्या शिंकांवर नियंत्रण मिळते.

2) मध आणि आल्याचं सेवन

आलं आणि मध हे दोन्ही नैसर्गिक औषधांसारखे काम करतात. गरम पाण्यात आलं किसून त्यात मध घालून प्यायल्यास घसा साफ राहतो. यामुळे शिंका, सर्दी आणि नाक बंद होण्याचा त्रास कमी होतो.

3) व्हिटॅमिन-सीयुक्त पदार्थ

कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे वारंवार शिंका येण्याची समस्या वाढू शकते. आहारात लिंबू, संत्री, आवळा यांसारखी फळे रोज खावीत. व्हिटॅमिन-सीमुळे इम्युनिटी वाढून ॲलर्जीपासूनही संरक्षण मिळते. हे सोपे उपाय तुम्हाला शिंकांपासून लांब ठेवतील.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Sneezing Remedies
BP Health: सतत थकवा जाणवतोय? लो ब्लड प्रेशर तर नाही ना, वाचा प्रमुख लक्षणे, पाहा तज्ज्ञ काय सांगतात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com