instant sabudana khichdi recipe in marathi
instant sabudana khichdi recipegoogle

Instant Sabudana Khichdi: साबुदाणे भिजवायला विसरलात? अशी बनवा मऊ-मोकळी इंस्टंट खिचडी

Fasting Recipe: साबुदाणे भिजवायला विसरलात तरी चिंता नको. कुकरमध्ये झटपट तयार होणारी ही इंस्टंट साबुदाणा खिचडी मोकळ्या दाण्यांची, चविष्ट आणि उपवासासाठी परफेक्ट रेसिपी आहे.
Published on

अनेकजण उपवासाच्या दिवशी साबुदाण्याची खिचडी हा आवडता खायचं ठरवतात. पण ही खिचडी बनवण्यासाठी साबुदाणे आधी 5 ते 6 तास किंवा रात्रभर भिजत घालावे लागतात. बऱ्याचवेळेस घाईगडबडीत आपण साबुदाणे भिजवायला विसरतो. अशा वेळी काय करायचं असा प्रश्न पडतो. आता काळजी करण्याचं कारण नाही, कारण भिजवायचा त्रास न घेता तुम्ही झटपट मोकळ्या दाण्यांची साबुदाण्याची खिचडी बनवू शकता.

तुम्ही ही इंस्टंट खिचडी बनवण्यासाठी सर्वप्रथम एक कप मध्यम आकाराचे साबुदाणे घ्या. कडीपत्ता, हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरे, शेंगदाणे, उकडलेले बटाटे, सैंधव मीठ आणि मिरीपूड तयार ठेवा. चव वाढवण्यासाठी थोडी साखर आणि लिंबाचा रसही वापरु शकता. यानंतर साबुदाणे 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्या. एका स्टीलच्या डब्यात थोडं तूप लावून त्यात साबुदाणे, सैंधव मीठ आणि थोडंसं पाणी घालून मिक्स करा आणि डबा बंद करा. कुकरमध्ये बटाटे उकडवायला ठेवा आणि त्याचसोबत साबुदाण्याचा डबाही आत ठेवा. 3 ते 4 शिट्ट्या मोठ्या आचेवर घ्या आणि नंतर 2 ते 3 मिनिटं तसंच शिजू द्या.

instant sabudana khichdi recipe in marathi
High Blood Pressure: BP वाढलाय; सावधान! उद्भवतील 'या' 3 गंभीर समस्या, डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला

कुकर थंड झाल्यावर बटाटे बाहेर काढा आणि सावधपणे साबुदाण्याचा डबा उघडा. मग थोडा वेळ थंड झाल्यावर साबुदाणे छान मोकळे झालेले दिसतील. जर पाणी जास्त वाटत असेल तर साबुदाणे चाळणीत काढून थोडा वेळ पसरून ठेवा.

आता कढईत तूप किंवा तेल गरम करून शेंगदाणे भाजून घ्या. त्यानंतर उरलेल्या तुपात जिरे, हिरवी मिरची आणि करीपत्त्याची फोडणी घाला. उकडलेले बटाटे तुकडे करून त्यात टाका. मग त्यावर सैंधव मीठ आणि मिरीपूड घालून शेवटी साबुदाणा मिक्स करुन घ्या. मंद आचेवर खिचडी हलक्या हाताने परता. आवडीनुसार थोडी साखर घालू शकता.

खिचडी तयार झाल्यावर गॅस बंद करा आणि वरून कोथिंबीर, भाजलेले शेंगदाणे आणि लिंबाचा रस घाला. गरमागरम सर्व्ह करा. ही खिचडी दही किंवा हिरव्या चटणीसोबत खाल्ल्यावर ती जास्त चविष्ट लागते. विशेष म्हणजे भिजवायची गरज नसतानाही ही खिचडी अगदी मोकळी आणि चवदार तयार होते.

instant sabudana khichdi recipe in marathi
Jaljeera Recipe: उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारा जलजीरा घरी कसा बनवायचा? वाचा सोपी रेसिपी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com