Jaljeera Recipe: उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारा जलजीरा घरी कसा बनवायचा? वाचा सोपी रेसिपी

Sakshi Sunil Jadhav

थंडगार पेय

उन्हाळ्यात अनेकांना थंड पेय प्यायला आवडतं. पुढे आपण लिंबू पाणी नाही तर, जलजीरा पुदिन्याचं पाणी कसं बनवायचं? हे जाणून घेणार आहोत.

mint drink recipe

पोटाच्या समस्या

तुम्हाला उन्हाळ्यात जर पोट फुगण्याचा अपचनाचा त्रास होत असेल तर हे पेय तुम्हाला लगेचच थंडावा देईल. पुढे याची रेसिपी देण्यात आली आहे.

mint drink recipe

जलजीऱ्याची घरगुती रेसिपी

जळजीरा हे पुदिना, जिरे आणि चिंचेच्या चवीने बनणारे थंडगार पारंपरिक भारतीय पेय आहे. यात वापरलेले जिरे आणि काळे मीठ पचन सुधारण्यास मदत करतात. शरीरातील उष्णता कमी करून ताजेतवाने ठेवण्याचे काम करते.

acidity relief drink

मुख्य साहित्य

पुदिन्याची पाने, कोथिंबीर, भाजलेले जिरे, काळे मीठ, चिंचेचा गर आणि लिंबाचा रस या साहित्यात तुम्ही हा रस किंवा ज्यूस तयार करू शकता.

acidity relief drink

स्टेप १

पुदिना आणि कोथिंबीर ब्लेंड करून गाळून घ्यावी, त्यात मसाले आणि चिंचेचा गर मिक्स करुन घ्या.

acidity relief drink

स्टेप २

लिंबाचा रस आणि साखर घालून आंबट-गोड चव बॅलेन्स करता येते.

bloating remedy

स्टेप ३

सर्व्ह करताना थंड पाणी आणि बर्फाचे तुकडे घाला. त्याने चव जास्त वाढते. बाजारातल्या सॉफ्ट ड्रिंक्सऐवजी जलजीरा हा नैसर्गिक आणि हेल्दी पर्याय आहे.

bloating remedy

लक्षात ठेवा

दुपारच्या वेळी किंवा जेवणानंतर घेतल्याने पचनास मदत होते आणि शरीराला ऊर्जा मिळते.

bloating remedy

NEXT: पनीर खाल्ल्याने वाढतो कोलेस्ट्रॉलचा धोका? काय आहेत दुष्परिणाम? वाचा

paneer cholesterol risk
येथे क्लिक करा