मुंबई :कोणत्याही ऋतूत आपल्या घाम हा येतच असतो. त्यामुळे शरीरातून घाम पाण्यासारखा बाहेर पडतो. त्वचेसोबतच केसांवरही त्याचा परिणाम होतो. पावसाळ्यात (Monsoon) याचा अधिक त्रास आपल्याला होतो. (Hair care tips in Marathi)
हे देखील पहा -
घामामुळे केसांमध्ये (Care) जास्त तेल जमा होऊन ते चिकट होतात. यामुळे केस गळती आणि कोंडा होण्याची समस्याही अधिक वाढते. त्यामुळे पावसाळ्यात केसांची विशेष काळजी घेणेखूप गरजेचे आहे. दमट हंगामात तेलकट केसांची काळजी घेण्यासाठी काय करायला हवे हे जाणून घेऊया.
हा हेअर केअर रुटीन फॉलो करा-
१. बऱ्याचदा सकाळी उठल्यानंतर आपली केस ओली वाटू लागतात अशावेळी आपण आपल्या उशीकडे पाहाणे गरजेचे आहे. उशी जर घामाने ओली झाली असेल तर आपण कोरड्या टॉवेलने केसांना गुंडाळा आणि थोड्या वेळाने हलक्या हाताने पुसा. पुसताना स्कॅल्पला घासू नका.
२. तेलकट केसांना धुण्यावेळी शॅम्पो वापरताना तो दर दोन दिवसांनी वापरावा. केस धुताना किंवा शॅम्पू करताना स्कॅल्पला स्क्रब केल्याने जास्त तेल (Oil) तयार होऊ लागते. त्यामुळे रोज केस धुण्याऐवजी एक दिवस आड केसांना शॅम्पू लावून ते धुण्याचा प्रयत्न करा.
३. केसांवर ड्राय शॅम्पू वापरल्यानंतर आपण कंडिशनरचा वापर करावा. यामुळे दिवसभर केस चमकदार राहतील. केसांना कंडिशनर लावल्यास केसांचे धुळीपासून संरक्षण होण्यास मदत होते.
४. तेलकट केसांसाठी आपण आपल्या आहारात जीवनसत्त्व-बी २ आणि बी ६ चा समावेश करायला हवा. यासाठी आपण दलिया, सोया उत्पादने, टोमॅटो, दही, राजमा, सफरचंद आणि बदाम खाऊ शकता. यामुळे केसांमधून बाहेर पडणारे अतिरिक्त तेल नियंत्रित होते.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
Edited By - Komal Damudre
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.