Eye Flu Precaution : बस किंवा मेट्रोने प्रवास करताना डोळ्यांचा फ्लू टाळण्यासाठी या सेफ्टी टिप्स फॉलो करा

Eye Flu Symptoms : देशासह राज्यातही आय फ्लूचा धोका वाढताना दिसत आहे.
Eye Flu Precaution
Eye Flu PrecautionSaam Tv

Safety Tips To Protect Your Eye From Eye Flu : देशासह राज्यातही आय फ्लूचा धोका वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांत आय फ्लूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. जर तुम्ही रोज मेट्रो किंवा बस यांसारख्या सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करत असाल तर या टिप्सच्या मदतीने तुम्ही आय फ्लूचा धोका टाळू शकता.

सध्या देशभर पावसाचा कहर कायम आहे. एकीकडे पावसामुळे लोक त्रासले आहेत. तर दुसरीकडे पावसामुळे साथीचे आजार (Disease) वाढत आहेत. यातच आय फ्लूची साथ आली आहे. त्यामुळे पावसात सावध राहण्याचा सल्ला दिला जात आहे.

Eye Flu Precaution
Eye Flu: 'आय फ्लू' झाल्यास करा हे ५ घरगुती उपाय, त्वरित मिळेल आराम

पावसात आय फ्लूचे प्रमाण वाढताना दिसत आहे. अनेकजण ऑफिसला जाण्यासाठी सार्वजनिक वाहनांचा उपयोग करतात. या गर्दीच्या प्रवासात तुम्हालाही आय फ्लूची लागण होऊ शकते. आय फ्लू टाळण्यासाठी या काही म्हत्त्वाच्या टीप्स

सनग्लासेस किंवा चश्मा घाला

सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करत असाल तर सनग्लासेस किंवा इतर सुरक्षा चश्मा वापरा. सनग्लासेस किंवा चश्मा वापरल्याने तुम्ही डोळ्यांना हवेतील कण, धूळ आणि जंतूपासून दूर राहू शकतात. त्यामुळे तूम्ही डोळ्याच्या आजारापासून दूर राहू शकतात. जर तुमचे सनग्लासेस जास्त प्रभावी असतील तर तुमच्या डोळ्यांना अधिक संरक्षण मिळेल.

Eye Flu Precaution
Eye Flu: 'आय फ्लू' झाल्यास अशी घ्या काळजी, नाहीतर...

हाताच्या स्वच्छतेची काळजी घ्या

आय फ्लूचा प्रसार रोखण्याचा सोपा मार्ग म्हणजे हात स्वच्छ (Clean) ठेवणे. घाणेरड्या हातांनी तुमच्या डोळ्यांना स्पर्श करणे टाळा. हातांच्या साहाय्याने डोळ्यांच विषाणू जाऊ शकतात. हॅंड सॅनिटायझरची बॉटल नेहमी तुमच्यासोबत ठेवा. कोणत्याही वस्तूंना किंवा जागेला स्पर्श केल्यावर हात धूवायची सवय लावा.

आपल्या चेहऱ्याला स्पर्श करणे टाळा

स्पर्शांने अनेकदा विषाणू पसरतात. पर्यायी त्यामुळे आजार पसरले जातात.त्यामुळे न धुतलेल्या हातांनी तुमचे नाक, डोळे, किंवा तोंडाला स्पर्श करणे टाळा. स्पर्शाना आय प्लू प्रचंड लवकर पसरला जातो. त्यामुळे नेहमी चेहऱ्याला स्पर्श करताना हात स्पच्छ धुवा.

Eye Flu Precaution
Eye Flu Disease: 'आय फ्लू'चा धोका वाढला, जाणून घ्या या आजाराची लक्षणं

सामाजिक अंतर पाळा

कोरोनामुळे आपल्याला दोन व्यक्तींमध्ये अंतर ठेवणे हे किती महत्त्वाचे आहे याची जाणीव झाली सर्वांनाच आहे. त्यामुळे सामाजिक अंतर पाळणे खूप म्हत्त्वाचे आहे. गर्दीच्या ठिकाणी जर तुम्ही व्यवस्थित अंतर सोडून असाल तर त्यामुळे संसर्ग (Infection) पसरणे कमी होते. त्यामुळे सामाजिक अंतर पाळा.

वैयक्तिक वस्तू स्वच्छ ठेवा

प्रत्येक व्यक्ती घराबाहेर पडताना आपल्याला उपयोगी गोष्टी सोबत घेऊनच पडतो. यात आपली पर्स, मोबाईल अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो. या गोष्टींना आपण सारखा हात लावत असतो. त्यामुळे या गोष्टी नेहमी स्वच्छ ठेवणे खूप म्हत्त्वाचे असतो. या गोष्टींना स्पर्श केल्यानंतर आपण अनावधानाने डोळ्यालाही हात लावतो म्हणून या गोष्टी नियमित स्वच्छ ठेवणे म्हत्त्वाचे आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com