Priya More
तुम्हाला आय फ्लू झाला असेल तर इतर व्यक्तींच्या संपर्कात येणे टाळा. जेणेकरुन त्यांना याची लागण होणार नाही.
डोळ्यांना बर्फ लावा, जेणेकरून जळजळ आणि वेदना कमी होऊ शकतात.
डोळ्याच्या फ्लूची लागण झालेल्या व्यक्तीशी हस्तांदोलन टाळा.
तुम्हाला आय फ्लू झाल्यास तुमचा चष्मा, टॉवेल किंवा उशी इतरांना देणे टाळा.
स्वच्छ पाण्याने डोळे धुवत राहा. त्याचसोबत तुमचे हात देखील हँण्डवॉशने स्वच्छ धुवा.
तुम्हाला आय फ्लू झाला असेल तर डोळ्यांना वारंवार स्पर्श करणे टाळा.
डोळे स्वच्छ करण्यासाठी टिश्यू पेपर किंवा कापड वापरा.
डोळे पुसण्यासाठी वापरलेला टिश्यू पेपर किंवा कापड पुन्हा वापरणे टाळा.
तुम्हाला आय फ्लू झाला असेल तर टीव्ही-मोबाइलपासून अंतर ठेवा.
तुम्हाला आय फ्लू झाला असेल तेव्हा तुमच्या डोळ्यांवर काळा चष्मा लावा.