Priya More
डोळ्याच्या फ्लूमुळे तीव्र वेदना, सूज आणि डोळ्यात जळजळ होते. हा त्रास ग्रीन टीच्या माध्यमातून कमी होतो.
ग्रीन टीमध्ये दाहक-विरोधी आणि सुखदायक गुणधर्म असतात. यामुळे डोळ्यांना थंडावा मिळतो आणि सूज कमी होते.
आय फ्लू झाला असेल तर सलाइन वॉटर आय ड्रॉप्सप्रमाणे काम करते. तुम्ही हे ऑनलाईन अथवा मेडिकलमधून खरेदी करु शकता.
सलाइन वॉटरमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. ते आपल्या डोळ्यांना नैसर्गिकरित्या स्वच्छ करते.
आय फ्लूमध्ये तुमचे डोळे खूप दुखत असतील आणि जळजळ होत असेल तर तुम्ही डोळ्यांना गरम पाण्याचा शेक देऊ शकता.
गरम पाण्यामध्ये कापूस अथावा कपडा बुडबून तो आपल्या डोळ्यांना लावा. त्यामुळे डोळ्यांना आराम मिळतो आणि सूज कमी होते.
आय फ्लू झाला असेल तर तुम्ही डोळ्यांना थंड पाण्याचा शेक देऊ शकता.
त्यासाठी बर्फाचे पाणी घेऊन तुम्ही त्यामुळे कापड अथवा कापूस बुडून हलक्या हाताने डोळ्यांना लावा. यामुळे ही आराम मिळतो.
एरंडेल तेलामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. ते लावल्यामुळे डोळ्यांची सूज कमी होते.
एरंडेल तेल डोळ्याभोवती लावा. एक कपडा कोमट पाण्यात भिजवा आणि पापण्यांवर ठेवा. सुमारे 10 मिनिटे राहू द्या. हे दिवसातून दोनदा करा.