New Smartphone: 6000mAh बॅटरी असलेला हा जबरदस्त फोन अर्ध्या किमतीत मिळतोय, जाणून घ्या काय आहे ऑफर

Infinix Smart 7: 6000mAh बॅटरी असलेला हा जबरदस्त फोन अर्ध्या किमतीत मिळतोय, जाणून घ्या काय आहे ऑफर
Infinix Smart 7
Infinix Smart 7Saam Tv

Infinix Smart 7 Smartphone Offers:

Infinix ने आपल्या लोकप्रिय स्मार्टफोन Infinix Smart 7 च्या किमतीत मोठी कपात केली आहे. अशातच फोनची किंमत जवळपास निम्म्यावर आली आहे. याचा अर्थ Infinix Smart 7 ज्याची किंमत 9,999 रुपये होती, ग्राहकांना ती आता Flipkart सेलमध्ये फक्त 5,939 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. ही फोनची सर्वात कमी किंमत असल्याचा कंपनीचा दावा आहे.

Infinix Smart 7 च्या 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 9,999 रुपये आहे, जो तुम्हीडिस्काउंटनंतर 5,939 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. हा फोन तुम्ही मासिक फक्त 990 रुपये भरून देखील खरेदी करू शकता.

Infinix Smart 7
Xiaoma Mini EV: एका चार्जमध्ये मुंबईहून थेट दिल्ली गाठणार; किंमत फक्त 3.47 लाख; जबरदस्त आहे ही मिनी EV

या फोनच्या खरेदीवर 5,650 रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. याशिवाय बँक ऑफरमध्ये जवळपास 10 टक्के सूट देखील यावर मिळत आहे. हा फोन खरेदी केल्यावर, तुम्हाला 1 वर्षाची हँडसेट वॉरंटी दिली जाते. तसेच अॅक्सेसरीजवर 6 महिन्यांची वॉरंटी दिली जाते. फोन सुमारे 2TB Expandable स्टोरेज सपोर्टसह येतो. (Latest Marathi News)

स्पेसिफिकेशन

Infinix Smart 7 स्मार्टफोन 6.6 इंच HD Plus IPS डिस्प्ले सह येतो. फोटोग्राफी बद्दल बोलायचे झाले तर, तुम्हाला फोन मध्ये 13MP चा प्रायमरी कॅमेरा मिळत आहे. तसेच यात AI लेन्स सपोर्ट देण्यात आला आहे. याशिवाय फोनमध्ये 5MP फ्रंट कॅमेरा सेन्सर आहे.

Infinix Smart 7
Prevent Travel Sickness: तुमच्याही मुलांना कार आणि बसमध्ये उलट्या होतात? तर करा 'हे' उपाय

फोन 6000mAh बॅटरी सपोर्टसह येतो. प्रोसेसर म्हणून फोनमध्ये Unisoc Spreadtum SC9863A1 चिपसेट सपोर्ट करतो. फोन Android 13 आधारित ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com