Shukrawar che Upay: आर्थिक तंगी लगेच होईल दूर; शुक्रवारच्या दिवशी पुजेच्या वेळी करा 'हे' उपाय, लक्ष्मी होईल प्रसन्न

Friday Remedies To Get money: शुक्रवारी धनाची देवी लक्ष्मीची पूजा केल्याने भक्ताला इच्छित फळ मिळू शकतं. यासोबतच आनंद, सौभाग्य, उत्पन्न आणि समृद्धी वाढू शकते. लक्ष्मीची पूजा केल्याने धनाची कमतरता राहत नाही.
Friday Remedies To Get money
Friday Remedies To Get moneysaam tv
Published On

हिंदू धर्मामध्ये शुक्रवारी धनाची देवी लक्ष्मीची पुजा केली जाते. आज शुक्रवार असून आज तु्म्हीही लक्ष्मीची पूजा करू शकता. याचसोबत लक्ष्मी वैभवचा व्रत देखील ठेवला जातो. हा व्रत ठेवल्याने सुख आणि सौभाग्य मिळतं अशी मान्यता आहे. त्याचप्रमाणे तुमच्यावर कोणतंही आर्थिक संकट असेल तर ते दूर होण्यास मदत होते.

शुक्रवारच्या दिवशी भक्त भगवान विष्णू आणि धनाची देवी लक्ष्मीची भक्तीभावाने पूजा करतात. या दिवशी पूजेदरम्यान विशेष उपाय करू जातात. या उपायांचं तुम्ही पालन केल्याने माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळतो. जर तुम्हालाही आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळवायची असेल तर शुक्रवारी पूजेदरम्यान हे उपाय करणं तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे.

Friday Remedies To Get money
Mangal Gochar: जून महिन्यात भूमिपूत्र मंगळ सूर्याच्या राशीत करणार प्रवेश; 'या' राशींसोबत शुभ गोष्टी घडणार, मिळणार संपत्ती-यश

शुक्रवारी कोणते उपाय करू शकता

पांढऱ्या आणि लाल रंगाच्या फुलांची आवड देवी लक्ष्मीला आहे. त्यामुळे देवी लक्ष्मीला कमळ आणि गुलाबाची फुले अवश्य अर्पण करावीत. या उपायाचा अवलंब केल्याने देवी लक्ष्मी लगेच प्रसन्न होते. त्याच्या कृपेने सर्व इच्छा पूर्ण होतात.

  • जर तुम्हाला तुमच्या कुंडलीत शुक्र ग्रह बलवान करायचा असेल तर शुक्रवारी स्नान आणि ध्यान केल्यानंतर पांढरे कपडे परिधान करा. त्याचप्रमाणे पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान केल्याने तुमचा फायदा होईल. यावेळी तुम्ही तांदूळ, पीठ, दूध, दही इत्यादी वस्तू दान करू शकता.

Friday Remedies To Get money
Budhwar Ganesh Puja: गणपती बाप्पााच्या आशिर्वादासाठी करा 'हे' चमत्कारी उपाय; करियर आणि बिझनेसमध्ये मिळेल चांगली संधी
  • या काळात जर तुम्हाला जर तुम्हाला आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळवायची असेल तर शुक्रवारी देवी लक्ष्मीची भक्तीभावाने पूजा करा.

  • प्रसाद म्हणून तांदळाची खीर आणि नारळ अर्पण करावा लागेल.

Friday Remedies To Get money
Guruvar che Upay: सतत पैशांच्या तंगीसह आयुष्य जगताय, गुरुवारच्या दिवशी करा 'हे' उपाय, घरात होईल पैशांचा पाऊस
  • करुणा आणि प्रेमाची देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कमळाच्या बियाण्यांपासून बनवलेल्या माळेचा वापर करून तिच्या नावाचा जप करा.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com