Guruvar che Upay: सतत पैशांच्या तंगीसह आयुष्य जगताय, गुरुवारच्या दिवशी करा 'हे' उपाय, घरात होईल पैशांचा पाऊस

Thursday Remedies To Get Business Profit: गुरुवारच्या दिवशी म्हणजे आज भगवान विष्णूची पूजा केल्याने आणि काही उपाय केल्याने व्यवसाय वाढतो. त्याचप्रमाणे कौटुंबिक जीवनात प्रेम वाढते. अनेक समस्या सोडवू शकतील असे काही उपाय जाणून घेऊया.
Thursday Remedies To Get Business Profit
Thursday Remedies To Get Business Profitsaam tv
Published On

आज गुरुवार आहे आणि आजचा दिवस भगवान विष्णु यांना समर्पित केला गेला आहे. या दिवसाची सुरुवात गुरु देव बृहस्पतिपासून होते. या दिवशी भगवान विष्णू आणि गुरु ग्रहाची पूजा केल्याने शुभ फळं मिळतं अशी मान्यता आहे. जीवनातील अनेक समस्या आणि त्रासांपासून मुक्तता मिळवण्यासाठी जर तुम्ही गुरुवारी घेतलेले उपाय पाळले तर चांगले परिणाम दिसून येतील. आजच्या गुरुवारी काय उपाय करायचे ते जाणून घेऊया.

गुरुवारी कोणते उपाय करावेत

बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी गुरुवारी स्नान करा, स्वच्छ कपडे घाला, गुरु ग्रहाचे ध्यान करा आणि मंत्रांचा जप करा. हा मंत्र आहे - 'ओम ऐं क्लीम बृहस्पतये नमः'. यावेळी २१ वेळा या मंत्राचा जप केल्याने ज्ञान आणि बौद्धिक क्षमता वाढू लागते.

Thursday Remedies To Get Business Profit
Kendra Trikon Rajyog: जूनमध्ये 'या' ३ राशींचं नशीब पालटणार; पैशांसह तुम्हाला मिळणार पद-प्रतिष्ठा

व्यवसायात मिळेल तुम्हाला नफा

जर व्यवसायामध्ये तुम्हाला मनाप्रमाणे नफा मिळत नसेल तर गुरुवारी पूजेदरम्यान भगवान विष्णूला चंदनाचा टिळा लावावा. चंदनाच्या सुगंधित अगरबत्ती देखील यावेळी तुम्ही लावू शकता. यामुळे व्यवसाय लवकरच तुम्हाला चांगला पैसा देईल.

Thursday Remedies To Get Business Profit
Kendra Trikon Rajyog: जूनमध्ये 'या' ३ राशींचं नशीब पालटणार; पैशांसह तुम्हाला मिळणार पद-प्रतिष्ठा

जर तुम्हाला तुमच्या मुलांकडून त्रास होत असेल तर तर गुरुवारी एक नवीन पिवळा रंगाचा कापड घ्या आणि तुमच्या मुलाला तो स्पर्श करायला लावा. आता हे कापड भगवान विष्णूच्या मंदिरात अर्पण करा. यावेळी मंत्र ओम क्लीम बृहस्पतये नमः या मंत्राचा ११ वेळा जप करा.

Thursday Remedies To Get Business Profit
Budhwar Ganesh Puja: गणपती बाप्पााच्या आशिर्वादासाठी करा 'हे' चमत्कारी उपाय; करियर आणि बिझनेसमध्ये मिळेल चांगली संधी

आयुष्यातील अडथळे होतील दूर

जर तुम्ही आयुष्यात वाईट काळातून जात असाल तर गुरुवारी भगवान विष्णूची पूजा करा आणि पाच गोमती चक्रं घेऊन त्यांना भगवान विष्णूसमोर ठेवा. आता अगरबत्ती आणि दिव्यांनी परमेश्वराची पूजा केल्यानंतर, गोमती चक्र घ्या आणि ते पिवळ्या कापडात बांधा आणि जवळ ठेवा. हा उपाय केल्याने जीवनातील अडथळे दूर होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com