Winter Health Tips: हिवाळ्यात रात्री हे पदार्थ टाळा; अन्यथा सर्दी-खोकल्याने व्हाल हैराण

Cold And Cough Prevention: हिवाळ्यात रात्री काही पदार्थ खाल्ल्याने सर्दी, खोकला आणि घशातील खवखव वाढते. या लेखातून जाणून घ्या कोणते पदार्थ रात्री टाळले पाहिजेत आणि त्याऐवजी काय खावे.
Cold And Cough Prevention
Winter Health TipsSaam Tv
Published On

नुकताच पावसाळा संपून हिवाळ्याला सुरुवात होताना आपल्याला दिसत आहे. हिवाळा हा ऋतू सगळ्यांच्याच आवडीचा असला तरी त्यामध्ये तुम्हाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. कारण हिवाळ्यात खाण्यापिण्याच्या सवयींकडे विशेष लक्ष द्यावे लागते. नाहीतर सर्दी-खोकला, गळ्यात खवखव अशा समस्या आपली पाठ सोडत नाहीत. यातच रात्री थंडीचे प्रमाण वाढते. याचा परिणाम शरीरावर जास्त होतो. पुढे आपण रात्री कोणते पदार्थ थंडीत टाळले पाहिजेत? याबद्दल सोप्या टिप्स जाणून घेणार आहोत.

दही

हिवाळ्यात दही खाणे टाळले पाहिजे. दह्यामुळे तुमच्या शरीरातला कफ वाढतो. त्याने घशात खवखव, सर्दी आणि खोकल्याचा त्रास जास्त होतो. याने तुम्हाला रात्री झोप पूर्ण लागत नाही. तुम्हाला दही खूप आवडत असेल तर तुम्ही दिवसा दही थोड्या प्रमाणात खाऊ शकता. रात्री खाल्याने तुम्हाला अनेक समस्यांना सामोरं जावे लागू शकते.

Cold And Cough Prevention
Heart Attack Symptoms: पायाच्या किरकोळ समस्या ठरतील जीवघेण्या; हार्ट अटॅकची लक्षणं अन्... तज्ज्ञ सांगतात

कोल्ड ड्रिंक्स

कोणाची बर्थडे पार्टी असो, काही थंड पिण्याची ईच्छा झाली असो अनेकांच्या मनात कोल्ड ड्रिंक्स हाच बेस्ट ऑप्शन येतो. मग आपण हे ड्रिंक रात्रीच पित असतो. मात्र थंडीच्या दिवसात कोल्ड ड्रिंक्स टाळले पाहिजे. तसेच आईस्क्रीम, कोल्ड ड्रिंक्स, दही, थंड ज्यूस असे पेय टाळले पाहिजेत. याने तुमचा सर्दी खोकला झपाट्याने वाढू शकतो.

तेलकट पदार्थ

थंडीच्या दिवसात तेलकट, तळलेले पदार्थ टाळले पाहिजेत. विशेषत: रात्रीच्या वेळेस हे पदार्थ खालल्याने खोकला वाढतो. सोबत गॅस, अपचन आणि कफचे प्रमाण वाढते. त्यामुळे हलके आणि गरम पदार्थ या दिवसात खाल्ले पाहिजेत.

गोड पदार्थ

जे पदार्थ गुळापासून तयार होतात ते पदार्थ किंवा मिठाई खाणं टाळलं पाहिजे. नाहीतर त्याने गळ्यात जळजळ आणि कफ जमा होतो. तसेच तुम्ही गरम टोमॅटो,व्हेज किंवा डाळीचे सूप पिवू शकता. खिचडी हा आहारातला बेस्ट ऑप्शन आहे. आलं, तुळस आणि मधाची चहा पिऊ शकता. याने तुमच्या सर्दी खोकल्याच्या समस्या कमी होतील आणि तुम्ही थंडीतही निरोगी राहाल.

Cold And Cough Prevention
Cancer Symptoms: सकाळी उशीवरच दिसतील कॅन्सरची लक्षणे, डॉक्टरांनी सांगितली धक्कादायक माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com