सध्या प्रत्येक पालकाला एकच चिंता भेडसावतीय, ती म्हणजे मुलांच्या लठ्ठपणाची. अलिकडच्या काळात मुलांमधला लठ्ठपणा दिवसेंदिवस वाढत चाललाय. त्यातही फॅटी लिव्हरची समस्या खूपच गंभीर बनलीय. अशातच दिल्ली एम्सच्या एक रिपोर्ट सोशल मीडियात तुफान व्हायरल होतोय. या मेसेजमुळे तमाम पालकवर्गाची चिंता वाढलीय. व्हायरल मेसेजमध्ये काय म्हंटलय, जाणून घेऊ...
या व्हायरल मेसेज म्हटले आहे की, लहान मुलांमध्ये फॅटी लिव्हरची समस्या वाढत चाललीय. विशेष म्हणजे कोणत्याही अल्कहोलचं सेवन न करता मुलांमध्ये चरबीचं प्रमाण वाढतंय. फास्ट फूड, जंक फूडच्या सेवनामुळे ही समस्या बळावलीय. फॅटी लिव्हरमुळे मुलांना डायबिटीज, हाय कोलेस्टेरॉल आणि ब्लड प्रेशरसारख्या गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. याशिवाय टीबीवरील काही औषध आणि एंटीबायोटिक्समुळेही फॅटी लिव्हरची समस्या होऊ शकते, असाही दावा करण्यात आलाय.
सगळ्यांचीच लहान मुलं जंक फूड खातात. जमाना फास्ट फूडचा असल्यानं फास्ट फूड खाणं पसंत करतात. मात्र मुलांच्या आरोग्याचा प्रश्न असल्यानं आम्ही याबाबत अधिक माहिती जाणून घेतली. एम्सच्या अहवालाबाबत आरोग्य तज्ञांशी संपर्क साधला. राज्य कामगार विमा योजना रुग्णालयाच्या बालरोग विभाग प्रमुख डॉ. शर्वरी भुतडा म्हणाल्या की, फॅटी लिव्हर आजार हा लिव्हरवर चरबी जमा झाल्याने होतो. याचे कारण म्हणजे मूळ बाहेरचं खातात. फ्रुट ज्यूस, पकड फूड अलीकडेच खूप जास्त प्रमाणात मूळ खात आहेत. यात औषध उपचाराची वेळ येत नाही, मात्र जीवनशैलीत बदल, हाच यावरील उपोय आहे.
लिव्हरमध्ये प्रमाणापेक्षा जास्त चरबी असल्यास त्या आजाराला फॅटी लिव्हर म्हंटलं जातं. चरबी व्यतिरिक्त लिव्हरला सूज असल्यास त्याला स्टीटोहेपेटाइटिस म्हटलं जातं. लिव्हरला जुनी सूज तसच त्यावर निशाण असल्यास त्याला फाइब्रोसिस म्हंटलं जातं. सुरुवातीला ही समस्या सर्वसाधारण वाटत असली तरी त्याचे परिणाम अत्यंत घातक आहे. यावर वेळीच नियंत्रण मिळवलं नाही तर हा आजार तुमच्या मुलांसाठी जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे मुलांची काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे.
फॅटी लिव्हर हा सामान्य आजार नाही. या आजारावर कोणतंही प्रभावी औषध नाही. हा आजार टाळायचा असेल तर दिवसभरात कमीत कमी 30 मिनटं नियमितपणे व्यायाम करा. जंक फूड, फास्ट फूड खाऊ नका. मैद्याचे पदार्थ खाणे टाळा. हिरव्या भाज्या, दूध, अंडी, फळं, सकस आहार करा.
आमच्या पडताळणीत व्हायरल मेसेजमध्ये करण्यात आलेला दावा खरा ठरलाय. आपली मुलं निरोगी राहावीत त्यांना लहान वयात गंभीर आजार होऊ नयेत असं वाटत असेल तर त्यांची काळजी घ्या, खाण्यापिण्याच्या सवयी बदला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.