Tight Bra Side Effects : हॉट आणि सुंदर दिसण्यासाठी तुम्ही सुद्धा घट्ट ब्रा वापरता; वाचा आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम

Side Effects of Tight Bra : काही मुलींचा असा समज आहे की, आपण जितकी जास्त घट्ट ब्रा वापरणार तितक्याच आपण अट्रॅक्टीव्ह आणि सुंदर दिसणार. मात्र हे पूर्णता चुकीचे आहे.
Side Effects of Tight Bra
Tight Bra Side Effects Saam TV
Published On

सुंदर दिसावं यासाठी मुली विविध स्टायलीश आणि फॅन्सी कपडे परिधान करतात. प्रत्येक तरुणी तिच्या आवडीनुसार कपडे परिधान करते. आउटफीटप्रमाणे मुलींना कंफर्टेबल ब्रा सुद्धा घालावी लागते. ब्रा परिधान केल्याने ब्रेस्टला सुद्धा सपोर्ट मिळतो आणि मुलींना सेफ फिल होतं. तसेच काही मुलींचा असा समज आहे की, आपण जितकी जास्त घट्ट ब्रा वापरणार तितक्यात आपण अट्रॅक्टीव्ह आणि सुंदर दिसणार. मात्र हे पूर्णता चुकीचे आहे.

Side Effects of Tight Bra
No bra day साजरा करू, तेव्हा हेमांगीने सहभागी व्हावं - तृप्ती देसाई

कारण ब्रा अट्रॅक्टीव्ह दिसण्यासाठी नाही तर ब्रेस्टला सपोर्ट मिळावा आणि व्यवस्थीत आकार असावा यासाठी परिधान केली जाते. मात्र काही महिला या सर्वांना फॅशन आणि सुंदरतेचं नाव जोडतात. असं करून महिला स्वात:साठी आणखी जास्त अडचणी वाढवून घेतात. जास्त घट्ट ब्रा परिधान केल्याने त्या महिलेला ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता असते. अनेक डॉक्टरांनी घट्ट ब्रा परिधान केल्यानेच ब्रेस्ट कॅन्सर होत असल्याचं म्हटलं आहे.

श्वास घेण्यास अडचणी

तुम्ही जितकी जास्त घट्ट ब्रा परिधान करता तितका जास्त त्रास तुमच्या आरोग्यावर होतो. घट्टा ब्रामुळे तुम्हाला श्वास घेता येत नाही. त्याचा थेट परिणाम तुमच्या फुप्फुसांवर होतो. यामुळे धाप लागणे, जीव गुदमरणे अशा समस्या जाणवतात.

पाठ आणि मान दुखणे

घट्ट ब्रा परिधान केल्यावर त्याचे पट्टे आपल्या खांद्यांमध्ये रुतात. तसेच पॅडेड ब्रामध्ये ब्रेस्टवर दाब येतो. यामुळे पाठ आणि मान दुखू लागते. हा त्रास वाढत जाऊन डोकं देखील दुखतं. कारण याचा संपूर्ण परिणाम आपल्या स्पाईनवर होत असतो.

त्वचेच्या समस्या

घट्ट ब्रा परिधान केल्याने संबंधित तरुणीला त्वाचेवर जळजळ, खाज येणे, त्वचेवर सुज येणे या व्याधी जाणवतात. स्किन लाल होणे, बारीक पुरळ येणे आणि रॅशेस वाढणे या समस्या सुद्धा वाढतात.

पाठीला बाक येणे

काही तरुणी जास्त घट्ट ब्रा परिधान करतात. त्यामुळे त्यांच्या खांद्यावर आणि पाठीवर सुद्धा दाब येतो. अशा तरुणी पाठ दुखत असल्याने सतत पाठीला बाक येईल असे बसतात.

अशी ब्रा वापरा

ब्रा कायम लूज किंवा जास्त टाइट नसावी. ब्राचे बेल्ट आपल्या खांद्यावर आणि पोटावर असतात. त्यामुळे काही महिलांना जेवणानंतर सुद्धा पोटावर जास्त ताण येतो. त्यामुळे ब्राचे हूक अॅटजेस्ट करता येतील असे असावेत. ब्रा जास्त कडक पॅड असलेली वापरू नका. सॉफ्ट पॅडेड ब्रा रोजच्या वापरात असूद्या.

Side Effects of Tight Bra
No bra day साजरा करू, तेव्हा हेमांगीने सहभागी व्हावं - तृप्ती देसाई

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com