Hair Growth Tips: आजपासून जेवणात हे पदार्थ खा, मुळापासून होईल केसांची वाढ

Best Food For Hair Growth: लांब व दाट केस हवे आहेत? रोजच्या आहारात पनीर, बदाम, ब्लॅक टी सारखे पौष्टिक पदार्थ खा आणि केसांची नैसर्गिक वाढ जलद करा. केस गळती कमी करण्यासाठी उपयुक्त घरगुती उपाय.
Best Food For Hair Growth
Hair Growth TipsSaam Tv
Published On

प्रत्येक महिलेला लांब केस हवे असतात. लांब केसांच्या वाढीसाठी महिला बरेच उपाय करतात. तुम्हाला माहितीये का? केसांच्या वाढीसाठी निरोगी खाणे देखील तितकच महत्वाचं आहे . याशिवाय नियमितपणे केस धुणे, केसांची काळजी घेणे , चांगला आहार घेणे हे केसांच्या वाढीसाठी फायदेशीर आहे. नियमितपणे आहारात तुम्ही जे पदार्थ खाता याचा फरक तुमच्या केसांवर आणि त्वचेवर दिसून येतो. यासाठी आज आम्ही तुम्हाला काही घरगुती सोप्या टिप्स देणार आहोत यामुळे केसांची वाढ होणार आहे. केसांना चांगले पोषण मिळणार आहे.

Best Food For Hair Growth
Pitru Paksha Rituals: पितृपक्षात वाढदिवस साजरा करावा का? शास्त्र काय सांगते

शाम्पू, तेल आणि मास्क हे केसांच्या वाढीसाठी मदत करतात. मात्र तुमची नियमितची आहारपद्धती देखील महत्वाची आहे. रोजच्या जेवणात पौष्टिक प्रथिनेयुक्त पदार्थ खाल्ल्यास नैसर्गिकरित्या तुमची केसांची वाढ होईल आणि केस जाड होण्यास मदत होईल. यासाठी तुम्ही आहारात कोणते पदार्थ खाल्ले पाहिजे ते जाणून घ्या.

Best Food For Hair Growth
Navratri Colour History: लाल, पिवळा, हिरवा... नवरात्रीचे रंग कोणी ठरवले? काय आहे नऊ रंगाचा इतिहास?

पनीर

पनीर हे प्रोटीनयुक्त आहे. पनीर खाल्ल्याने केसांना पोषण मिळते. पनीरमध्ये प्रोटीन, कॅल्शियम आणि व्हिटामीन डी असते. कमजोर केसांच्या वाढीसाठी पनीर खाण्याचा सल्ला दिला जातो.

बदाम

ड्रायफ्रुट्स आरोग्यासाठी पौष्टिक मानले जाते. बदाम खाल्लाने केसांना पोषण मिळते. बदाममध्ये व्हिटामीन ई, मॅग्नेशियम हे पोषक घटक असतात जे केस गळती रोखतात. केसांची चमकत वाढते. सकाळी दुधामध्ये बदाम खाल्ल्याने देखील फायदा होतो.

ब्लॅक टी

प्रोटीन आणि झिंकयुक्त ब्लॅक टी केसांसाठी फायदेशीर आहे. ब्लॅक टी केस गळती होण्यापासून रोखते. ब्लॅक टीमध्ये कॅफिनचे प्रमाण अधिक असते ज्यामुळे केसांची वाढ हळूहळू होते.

Best Food For Hair Growth
Diabetes And White Rice: भात खाल्ल्याने मधुमेह वाढतो का? तज्ज्ञांनी सांगितलं खरं कारण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com