Diabetes And White Rice: भात खाल्ल्याने मधुमेह वाढतो का? तज्ज्ञांनी सांगितलं खरं कारण

Diabetes Diet Tips: भात खाल्ल्याने मधुमेह वाढतो का? तज्ज्ञांच्या मते पांढऱ्या भातातील कार्बोहायड्रेट्स आणि ग्लायसेमिक इंडेक्स रक्तातील साखर वाढवतात. मात्र नियंत्रित प्रमाणात व योग्य आहारासह भात खाणे शक्य आहे.
Diabetes And White Rice
Diabetes And White RiceSaam Tv
Published On

बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेहाचा आजार ही मोठी समस्या बनली आहे. यामध्ये तरूणांपासून ते वयोवृद्ध देखील बळी पडले आहेत. मधुमेहाचा आजार शरीरातील हार्मोन्स असंतुलन झाल्यावर होतो. यासाठी मधुमेह झाल्यावर आरोग्याची काळजी घेतली जाते. मधुमेह झाल्यास काही पदार्थ खाणे बंद केले जाते. साखरेचे गोड पदार्थ खाल्ल्याने मधुमेह होतो. हे सर्वांनाच माहित आहे. मात्र अनेकांना असा प्रश्न आहे की, मधुमेह झाल्यास भात खाऊ शकतो का?

Diabetes And White Rice
Sarva Pitru Amavasya 2025: सर्व पितृ अमावस्येला या ४ ठिकाणी लावा दिवा, पैशांची होईल भरभराट

भात हा दैंनदिन आहारातील मुख्य पदार्थ आहे. अनेकांना भात खाल्ल्याशिवाय जेवण पूर्ण झालं असे वाटत नाही. भातामध्ये अनेक आवश्यक पोषक घटक असतात जे शरीरासाठी महत्वाचे मानले जाते. मात्र तुम्हाला माहितीये का अनेक आजारांमध्ये भाताचे सेवन आरोग्यासाठी घातक आहे. त्यात आढळणारे स्टार्चचे प्रमाण आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. यासाठी आज आपण जाणून घेऊया मधुमेह झाल्यास पांढरा भात खावा की नाही?

Diabetes And White Rice
Google Gemini Prompt: सलमान खान, शाहरूख खान या आवडत्या सेलिब्रिटीसोबत फोटो हवाय? मग हा प्रॉम्प्ट वापरा

मधुमेहींनी भात खाणे टाळावे असे अनेकदा म्हटले जाते. भातामध्ये कार्बोगायड्रेट्सचे प्रमाण अधिक असते जेव्हा आपण भात खातो तेव्हा शरीरातील ग्लुकोजमध्ये रूपांतरित होऊन रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. ज्यामुळे मधुमेह रूग्णांसाठी भात न खाण्याचा सल्ला दिला जातो.

Diabetes And White Rice
Numerlogy Prediction : मूलांक ३ वर पैशांचा पाऊस, मूलांक ५ ची होणार प्रगती; जन्म तारखेवरून जाणून घ्या आजचे राशीभविष्य

डॉक्टरांच्या मते, प्रत्येक 100 ग्रॅम भातात सुमारे 345 कॅलरीज असतात आणि तांदळाचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो. त्यात फायबर, मायक्रोन्युट्रिएंट्स आणि पॉलिफेनॉलचे प्रमाण कमी असते. पण यानंतरही भात खाऊ शकतो. मात्र यासाठी त्याचे प्रमाण आणि दर्जा किंवा गुणवत्ता याची काळजी घेणे आवश्यक आहे.

जर तुम्ही भात नियंत्रित प्रमाणात खात असाल आणि त्यात भाज्यांचा समावेश केला पाहिजे. तसेच तुमच्या आहारात सॅलड किंवा भाज्यांचे सूप समाविष्ट करा. जे शरीरातील ग्लायसेमिक इंडेक्सचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते. प्रथिने, हेल्दी फॅट आणि लो-कार्ब्सयुक्त भाज्या यासारख्या इतर पोषक घटकांचा प्रत्येक आहारात समावेश करण्याचा प्रयत्न करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com