Numerlogy Prediction : मूलांक ३ वर पैशांचा पाऊस, मूलांक ५ ची होणार प्रगती; जन्म तारखेवरून जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Numerlogy Prediction 18 september 2025: १८ सप्टेंबर २०२५ अंकशास्त्र भविष्य जाणून घ्या. मूलांक १ ते ९ साठी आजचा दिवस कसा असेल, आर्थिक लाभ, नोकरी, व्यवसाय आणि वैवाहिक जीवनावर होणारे परिणाम वाचा.
Numerlogy Prediction
Numerlogy PredictionSaam Tv
Published On

ज्योतिषशास्त्रात अंकशास्त्राला विशेष महत्व आहे. अंकशास्त्र एखाद्या व्यक्तीच्या मूलांक संख्येच्या आधारे त्याचे भविष्य आणि व्यक्तिमत्व ठरवते. प्रत्येक व्यक्तीचा स्वत:चा स्वामी ग्रह असतो. तुम्ही तुमच्या जन्मतारखेचे अंक १ते ९ पर्यंत जोडून तुमचा मूलांक निश्चित करू शकता. आजच्या तारखेनुसार मंगळ हा ९ क्रमाकांचा स्वामी ग्रह आहे. त्यामुळे आज सर्व मूलांक लोकांवर मंगळाचा प्रभाव असेल. आज गुरूवार आहे ज्याचा स्वामी ग्रह ३ असेल त्यांना अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे तसेच जोडीदाराशी संबंध चांगले होतील. यानुसार आज १८ सप्टेंबर अकंशास्त्रात १ ते ९ क्रमांक असलेल्यांचा दिवस कसा असेल हे सविस्तरपणे जाणून घेऊया.

मूळ क्रमांक १

अंक १ असलेल्यांचा आजचा दिवस चांगला असेल. सर्व नियोजित कामे पूर्ण होतील. तसेच व्यवसायात तुम्हाला भागीदारीतून मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. यामुळे आर्थिक लाभ संभवणार ाहे.

Numerlogy Prediction
Sarva Pitru Amavasya 2025: सर्व पितृ अमावस्येला या ४ ठिकाणी लावा दिवा, पैशांची होईल भरभराट

मूलांक २

ज्या व्यक्तीचा मूलांक २ आहे त्याच्यासाठी आजचा दिवस फलदायी असणार आहे. आर्थिक लाभ होणार आहे. तसेच तुमचे पैसे अडकले असल्यास ते परत होण्यासाठी आजचा दिवस फायदेशीर आहे.

मूलांक ३

ज्याचा अंक ३ आहे अश्यासांठी आजचा दिवस उत्तम आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला योग्य निर्णय घ्यावे लागणार आहे. आर्थिक अडचणी दूर होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

Numerlogy Prediction
Google Gemini Prompt: सलमान खान, शाहरूख खान या आवडत्या सेलिब्रिटीसोबत फोटो हवाय? मग हा प्रॉम्प्ट वापरा

मूलांक ४

ज्याचा अंक ४ आहे त्यांचा आजचा दिवस सामान्यपेक्षा कमी फलदायी आहे. कामामध्ये तुम्हाला आज अडचणी जाणवतील. वडिलधाऱ्या व्यक्तीकडे लक्ष द्यावे लागणार आहे.

मूलांक ५

मूलांक ५ असणाऱ्या व्यक्तीसाठी आजचा दिवस चांगला असेल. व्यवसायात तुमची वाढ होण्याची शक्यता असेल. तुम्हाला चांगला नफा मिळेल.

मूलांक ६

६ मूलांक असलेल्या व्यक्तीसाठी आजचा दिवस मध्यम फलदायी असेल. तुम्हाला एखाद्या गोष्टीची चिंता लागेल. तसेच आर्थिक फायदा होणार आहे. तु्म्ही पैसे गुंतवण्याचा विचार करू शकता.

Numerlogy Prediction
मुलीनों, Google Gemini वापरून बनवा आतापर्यंतचा सुंदर लूक, हे आहेत 5 Prompts

मूलांक ७

ज्यांचा मूलांक ७ आहे त्यांचा आजचा दिवस मध्यम फलदायी असणार आहे. महत्वाच्या कामामध्ये लक्ष द्यावे लागणार आहे. कामाच्या ठिकाणी वाद टाळावे. तुम्हाला आज सावधगिरीने निर्णय घ्यावा लागेल.

मूलांक ८

ज्या व्यक्तीचा मूलांक ८ असेल अश्या व्यक्तांसाठी आजचा दिवस कमी आहे. आज मानसिक त्रास जाणवू शकतो. तसेच आज कोणताही निर्णय घेऊ नका. तुमच्या साथीदाराची काळजी घ्या.

मूलांक ९

मूलांक ९ असणाऱ्या व्यक्तीसाठी आजचा दिवस चांगला असले. सकारात्मक विचारांमुळे आज कामे पूर्ण होतील. तुम्हाला उत्साही वाटेल. आर्थिक लाभ संभवण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवणे महत्वाचे असेल.

Numerlogy Prediction
Pitru Paksha 2025: पितृपक्षात चुकूनही या भांज्याचे सेवन करू नका, होऊ शकतो त्रास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com