Best Option To Buy Phone: "Fast Charging की Long Lasting" कोणते स्मार्टफोन्स आहेत जास्त फायदेशीर

Benefits of Fast Charging Phone: कोणाची बॅटरी अधिक काळ चालणारी असते तर कोणाची बॅटरी लवकर चार्ज होणारी असते.
Which is Best Option To Buy Phone
Which is Best Option To Buy PhoneSaam Tv
Published On

Smartphones Buying Guide: हल्ली बाजारात अनेक नव-नव्या फिचरर्सचे स्मार्टफोन लाँच होत असतात. कोणाची बॅटरी अधिक काळ चालणारी असते तर कोणाची बॅटरी लवकर चार्ज होणारी असते. अशावेळी आपण जेव्हा स्मार्टफोन खरेदीसाठी बाजारात जातो तेव्हा नक्की कोणता स्मार्टफोन घ्यावा हा प्रश्न पडतो.

सध्या बाजारात (Market) ट्रेंड आहे तो फास्ट चार्जिंगच्या स्मार्ट फोन्सचा. Xiaomi, OnePlus, Realme सारख्या स्मार्टफोन विक्रेत्या कंपन्यांकडून 150W फास्ट चार्जिंग देणारे स्मार्टफोन्स लाँच करण्यात आले आहेत. या कंपन्याचा (Company) दावा असा आहे की हे फोन्स अगदी 10 मिनिटांच्या कालावधीत 60 ते 70 टक्के चार्ज होतात आणि 15 ते 20 मिनिटांत फोन (Phone) पूर्ण चार्ज होऊ शकतात.

Which is Best Option To Buy Phone
Latest Smartphones 2023: Dimensity 8020 प्रोसेसर आणि 5000mAh बॅटरी, Motorola Edge 40 भारतात लॉन्च

तर, याउलट दुसरीकडे Samsung कडून मात्र अजूनही पूर्वीसारखी 25 ते 45W ची फास्ट चार्जिंग दिली जाते. चला याबाबतीत सविस्तर जाणून घेऊया.

1. फास्ट चार्जिंगमुळे बॅटरीवर परिणाम होतो का?

फास्ट चार्जिंग देणाऱ्या फोन्सना विशिष्ट प्रकारे बनवलेले असते. त्याच्या सोबत दिला गेलेला चार्जर हा देखील त्याच विशिष्ट प्रकारे बनवला गेला असल्यामुळे त्याची बॅटरी लवकर खराब होत नाही. आपल्या फोन्समध्ये फिक्स्ड बॅटरी सायकल असते. त्यामुळे तज्ज्ञ फास्ट चार्जर असलेल्या फोन्सना इतर कोणत्याही चार्जरने चार्ज न करण्याचा सल्ला देतात. असे केल्याने फोनची बॅटरी बिघडू शकते.

Which is Best Option To Buy Phone
Smartphone side effects : मोबाइल उशाशी ठेवून झोपण्याच्या सवयीमुळं कॅन्सरचा धोका? तज्ज्ञांकडून गंभीर इशारा

2. 'फास्टचार्जिंग की लाँग लास्टिंग बॅटरी' कोणते फोन्स आहेत जास्त फायदेशीर?

जर तुम्ही फोनला चार्ज करायला विसरले असाल किंवा अशा ठिकाणी राहात असाल जिथे विजेची समस्या आहे तर तुम्हाला लाँग लास्टिंग बॅटरी असणारे स्मार्टफोन वापरण्यास फायदेशीर ठरतील. खरेतर जास्त वोल्टज असणाऱ्या बॅटरीच्या फोन्सची लाइफ अधिक असते.

याउलट जर तुम्ही फोनचा अधिक वापर करत असाल आणि तुम्हाला फोन चार्ज करण्यासाठी वेळ मिळत नसेल तर तुमच्यासाठी फास्ट चार्जिंग असणारे फोन्स जास्त फायदेशीर ठरतील. तसे पहायला गेलं तर लाँग लास्टिंग बॅटरीचा फोन घ्यायचा की फास्ट चार्जिंगचा फोन घ्यायचा ही ग्राहकांची वैयक्तीक पसंत आहे.

Which is Best Option To Buy Phone
Gauri Kulkarni : हँसती रहे तू हँसती रहे, गौरीचा नवा लूक...

3. फास्ट चार्जिंगचे फायदेः

फास्ट चार्जिंगने फोनची बॅटरी लवकर चार्ज होते. ज्यामुळे फोन चार्ज करण्यात जास्त वेळ घालवावा लागत नाही. त्याबरोबरच या फोन्सची बॅटरी आकाराने लहान असते त्यामुळे फोन वापरण्यासाठी हलके असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com