Motorola Edge 40 launched in India: स्मार्टफोन निर्माता कंपनी Motorola ने आपला नवीन फोन Motorola Edge 40 भारतात लॉन्च केला आहे. ज्यामध्ये MediaTek Dimensity 8020 प्रोसेसर आणि 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे.
हा फोन Motorola च्या अधिकृत वेबसाइट आणि Flipkart वर लॉन्च करण्यात आला आहे. या नवीन फोनची विक्री आजपासून सुरू झाली आहे. या फोनच्या किंमती आणि फीचर्सबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.
भारतात लॉन्च होण्यापूर्वी या फोनने लॅटिन अमेरिका, मध्य पूर्व, युरोप आणि आशियाच्या बाजारपेठेत सादर करण्यात आला आहे. भारतापूर्वीही कंपनीने मोटोरोला एज 40 आणि मोटोरोला एज 40 प्रो मे महिन्याच्या सुरुवातीलाच जागतिक बाजारात लॉन्च केला होता. सध्या Motorola ने भारतात फक्त Motorola Edge 40 सादर केला आहे. (Latest Marathi News
Motorola Edge 40 मध्ये 6.55-इंचाचा फुल एचडी प्लस पोलराइज्ड डिस्प्ले पॅनल आहे, जो 144Hz च्या रीफ्रेश रेट 2400 x 1080 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 1200 nits च्या पीक ब्राइटनेससह येतो. Motorola च्या या नवीन हँडसेटमध्ये MediaTek Dimensity 8020 5G SoC प्रोसेसर समाविष्ट करण्यात आला आहे. (Viral Video News)
फोनमध्ये 8 GB रॅम आणि 256 GB इनबिल्ट स्टोरेज आहे. याशिवाय फोटोग्राफीसाठी Motorola Edge 40 फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्याचा प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सेल आणि सेकंडरी कॅमेरा 13 मेगापिक्सेलचा आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी, तुम्हाला यात 32-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. (Lifestyle News)
Motorola Edge 40 भारतात तीन रंगांच्या पर्यायांसह सादर करण्यात आला आहे. ज्यामध्ये एक्लिप्स ब्लॅक, लूनर ब्लू आणि नेबुला ग्रीन कलरचा समावेश आहे. 30 मे 2023 पासून हा फोन कंपनीच्या अधिकृत साइट आणि फ्लिपकार्टवरून खरेदी करता येईल. कंपनीने फ्लिपकार्टवर याची प्री-बुकिंग सुरू केली आहे. Motorola ने Edge 40 ला 8GB RAM आणि 256GB इनबिल्ट स्टोरेजसह एकाच प्रकारात सादर केला आहे. ज्याची किंमत 29,999 रुपये ठेवण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.