Fashion Beauty Tips : दसऱ्याला चेहाऱ्यावर सुंदर ग्लो हवा आहे? मग तुरटीचा 'हा' उपाय आजच ट्राय करा

Skin Care : चेहऱ्यावरील डाग निघून जावेत म्हणून तुम्ही तुरटीचा वापर करू शकता. तुरटी आपल्या स्किनसाठी उत्तम आहे. त्याने चेहऱ्यावर चांगला ग्लो येतो.
Skin Care
Fashion Beauty Tips Saam TV
Published On

सुदंर त्वचा मिळवण्यासाठी मुली काय काय नाही करत. विविध प्रोडक्ट चेहऱ्यावर अप्लाय करतात. हर्बलपासून कॉस्मेटीक्सपर्यंत सर्व गोष्टी मुली चेहऱ्यावर अप्लाय करतात. मात्र आतापर्यंत तुम्ही चेहऱ्यावर कधी तुरटी लावली लावली आहे का. चेहऱ्यावर तुरटी लावल्याने स्किन अगदी चकचकीत चमकू लागते.

Skin Care
Fashion Beauty Tips : 'हे' ५ दागिने महिलांकडे असलेच पाहिजेत; ऑफिससह, लग्नसमारंभात तुम्हीच दिसाल उठून

हिवाळा सुरू झाला की, आपली स्किन ड्राय होते. त्वचा ड्राय झाल्यावर त्यावर कोणतंही प्रोडक्ट अप्लाय केल्यास त्याने स्किन खराब होते. त्यामुळे स्किन नरम आणि मुलायम असणे महत्वाचे असते. त्यामुळेच चेहऱ्यावर तुरटी कशा पद्धतीने अप्लाय करायची याची माहिती जाणून घेणार आहोत.

तुरटी आणि गुलाबजल फेसपॅक

सर्वात आधी एक चमचा तुरटी पावडर घ्या. यामध्ये २ चमचे गुलाबजल मिक्स करा. गुलाबजलला सुंदर सुगंध असतो. त्यामुळे चेहऱ्यावर तुरटी अप्लाय केल्यानंतर ती १५ ते २० मिनिटे तशीच ठेवा. तसेच नंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.

तुरटी आणि मुलतानी माती

मुलतानी माती चेहऱ्यावरील डेड स्किन दूर करते. तर तुरटी चेहऱ्यावर नॅचरल ग्लो आणण्यास सुरुवात करते. त्यामुळे सुंदर दिसण्यासाठी दोन्ही पावडर एक एक चमचा मिक्स करून त्यात थोडं पाणी घ्या आणि थिक पेस्ट बनवा. अशा पद्धतीने तुमचा दुसरा फेसपॅक तयार होईल. हा फेसपॅक सुद्धा तुम्हाला काही वेळासाठीच चेहऱ्यावर लावून ठेवायचा आहे.

तुरटी आणि दही

दह्यामध्ये बरंच प्रोटीन असतं. त्यामुळे आहारात याचा समावेश असणे महत्वाचं आहे. तसेच आपल्या त्वचेसाठी सुद्धा दही रामबाण आहे. यातील महत्वाचे घटक त्वचेला योग्य ते प्रोटीन मिळवून देतात. त्यामुळे तुरटीमध्ये थंड पाण्यासह दही मिक्स करा. अशा पद्धतीने तयार झाला तुरटी आणि दही फेसपॅक.

चेहऱ्यावर तुरटी लावण्याचे फायदे

चेहऱ्यावर तुरटी लावल्याने त्याने पिपंल्स कमी होतात. स्किन लूज पडली असेल तर ती टाइट होते. चेहऱ्यावर आलेल्या सुरकूत्या दूर होतात. तसेच चेहऱ्यावर काही डाग असतील तर ते सुद्धा दूर होतात.

Skin Care
Bridal Beauty Tips: नवरी म्हणून स्पेशल दिसायचंय? मग मेकअप व्यतिरिक्त एक महिना आधीपासून 'या' टिप्स फॉलो करा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com