Bridal Beauty Tips: नवरी म्हणून स्पेशल दिसायचंय? मग मेकअप व्यतिरिक्त एक महिना आधीपासून 'या' टिप्स फॉलो करा

Beauty Tips For Bridal : तुमच्या लग्नाला अता एक महिना शिल्लक असेल तर त्यासाठी नवरीने काही टिप्स फॉलो केल्या पाहिजेत. याने नवरीच्या चेहऱ्यावर सुंदर ग्लो येतो.
Beauty Tips For Bridal
Bridal Beauty TipsSaam TV
Published On

लग्नाच्या दिवशी आपण सुंदर दिसावं अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते. लग्नाचा दिवस प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील खास क्षण असतो. या दिवशी नवरी मुलगी सर्वात स्पेशल असते आणि तिला पाहण्यासाठी साऱ्यांच्या नजरा वाट पाहत असतात. लग्नात प्रत्येक मुलगी सुंदर दिसण्यासाठी साजश्रृंगार करते आणि चेहऱ्यावर मेकअप अप्लाय करते. मात्र फक्त लग्नाच्या दिवशी मेकअप केल्याने चेहऱ्यावर पाहिजे तसा ग्लो येत नाही. त्यासाठी होणाऱ्या नवरीला एक किंवा दोन महिने आधीच ग्लोइंग स्किनसाठी तयारी करावी लागते. त्यामुळे आज नवरी सुंदर दिसावी म्हणून मेकअप व्यतिरिक्त काय केले पाहिजे याच्या काही खास टिप्स जाणून घेऊ.

Beauty Tips For Bridal
Viral Video: लंडनच्या मेट्रोमध्ये भारतीय संस्कृतीचे दर्शन; लाल रंगाचा लेहंग्यात भारतीय तरुणीने केली लंडनस्वारी

मेडिटेशन

लग्नाच्या एक-दोन आठवड्या आधी मनाच्या शांतीसाठी मेडिटेशन करायला सुरुवात करावी. या दिवशी स्वत:च्या शरीराला फ्रीमाईंड ठेवणे खूप गरजेचे आहे. कारण लग्नाअगोदर रोज मेडिटेशन केल्याने आपल्या शरीरावर ताण पडत नाही. आपण सकारात्मक गोष्टींचा विचार करायला लागतो. मेडिटेशन केल्याने मन एकाग्र होत असते. त्यामुळे तुम्ही लग्न ठरल्यावर महिनाभर आधी पंधरा मिनिटे दररोज मेडिटेशन करा. मेडिटेशन केल्याने तुमचा चेहरा सुंदर आणि टवटवीत दिसायला लागेल.

योग्य झोप

लग्नाच्या सीझनमध्ये खूप कार्यक्रम असल्यामुळे, शरीर दमलेले असते. त्यामुळे या दिवसांत आठ तासांची झोप मिळणे फार कठीण आहे. अशावेळी तुम्ही झोपण्याची योग्य वेळ ठरवली पाहिजे. योग्य वेळ ठरवल्याने तुमचे शरीर थकणार नाही. या दिवसांत तुम्हाला ५ तासांची झोप पण पुरेशी आहे.

बाहेरचे पदार्थ खाणे टाळा

लग्नाच्या एक- दोन आठवड्या आधी बाहेरचे कोणतेही पदार्थ खाऊ नका. बाहेरचे पदार्थ खाल्याने तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स सारख्या समस्या उद्भवू शकता. या पदार्थाचं जास्त प्रमाणात सेवन केल्याने तुमचे पोट पण बिघडू शकते. म्हणून या दिवसांत बाहेरच्या पदार्थांचे कमी प्रमाणात सेवन करा.

केसांची मालिश करा

प्रत्येक मुलीच्या जीवनात केसांना फार महत्व आहे. केसांमुळे मुलींची शोभा वाढत असते. मुलीच्या आयुष्यातील दुसरं सौंदर्य केस आहेत. त्यामुळे लग्नाच्या दिवसांत केसांची मालिश केल्याने आपण रिलॅक्स फिल करत असतो. मालिश केल्याने आपल्या केसांची वाढ होते त्याबरोबर आपले डोके हलके राहायला मदत होत असते. तुम्ही या दिवसांत एखाद्या हेअर सलूनकडे जावूनही हेअर मसाज घेवू शकता.

शरीराला हायड्रेटेड ठेवा

वेडिंग सेरेमोनीमध्ये स्वत:ला हायड्रेटेड ठेवणे फार महत्वाचे आहे. या वेळी तुम्ही तुमच्या आहारात पाणी असणाऱ्या फळांचा आणि भाज्यांचा समावेश करा. लग्नाच्या दिवसांत तुम्ही कुठे शॅापिंगला जात असाल तर, पाण्याची बॅाटल सोबत ठेवा. कारण पाणी शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करत असते. त्यामुळे शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी दररोज ८ लीटर पाणी प्या.

Beauty Tips For Bridal
Pre-Bridal Skin Care Tips: पुढच्या महिन्यात लग्न आहे; सुंदर दिसण्यासाठी प्रत्येक वधूने फॉलो करा या टिप्स

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com