Gold Price: आत्ताच खरेदी करा सोनं; दर गगनाला भिडण्याची शक्यता, लग्नाच्या दागिन्यांच्या विक्रीत ५० टक्क्यांची वाढ

Gold Price: गणेश चतुर्थी आणि नोव्हेंबरमधील लग्नसराईसाठी सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीत ५०% वाढ झालीय. सोन्याच्या किमतीत घसरण आणि सोन्याचे भाव वाढण्याच्या भीतीने लोक लग्नासाठी दागिन्यांची खरेदी करत आहेत. दिवाळीत सोन्याचे दर वाढण्याची शक्यता आहे.
Gold Price: आत्ताच खरेदी करा सोनं; दर गगनाला भिडण्याची शक्यता, लग्नाच्या दागिन्यांच्या विक्रीत ५० टक्क्यांची वाढ
Gold Silver Price SundaySaam TV
Published On

देशात सोन्याचे दर वधारले आहेत, आता सध्या सोन्याची किंमत ७२००० रुपये आहे. या दरामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शनिवारपासून गणेश चतुर्थी सुरू होत आहे त्यानंतर सणासुदीचे दिवस येत आहेत. तर नोव्हेंबरपासून लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. यामुळे येत्या काही दिवसात सोन्याचे दर गगनाला भिडतील असा अंदाज काही व्यापाऱ्यांकडून वर्तवला जात आहे. त्याचाच परिणाम म्हणून सोन्याच्या मागणीत ५० टक्क्यांनी वाढ झालीय.

दर वाढण्याच्या भीतीने ग्राहक लग्नसराईसाठी आत्ताच सोन्याची खरेदी करत आहेत. तज्ज्ञांच्या मतानुसार, सणांच्या काळात सोन्याचा दर ७६ हजार रुपयांच्या पुढे जाऊ शकतो. वामन हरी पेठे यांचे भागीदार आशिष पेठे यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या आसपास सोन्याचे भाव वाढत असतात. सरकारने कस्टम ड्युटी कमी केल्यामुळे सध्या किमतीत सुधारणा झालीय. आधी लग्नासाठी महिनाभर अगोदरच सोन्याच्या दागिन्याची खरेदी केली जायची. परंतु आता सोन्याचे भाव आणखी वाढण्याची भीती असल्याने लोक लग्नासाठी आधीच सोन्याचे दागिने खरेदी करताहेत.

Gold Price: आत्ताच खरेदी करा सोनं; दर गगनाला भिडण्याची शक्यता, लग्नाच्या दागिन्यांच्या विक्रीत ५० टक्क्यांची वाढ
State Revenue Sources : राज्यांकडे पैसा येतो तरी कुठून? तिजोरी रिकामी झाली की कर्मचाऱ्यांना पगारही मिळणं होतं मुश्किल

तज्ज्ञांच्या मते, सप्टेंबरमध्ये अमेरिकेत दर कपात झाल्यास सोन्याच्या किमतीत हालचाल दिसून येईल. दर कमी झाल्यास सोन्याचा भाव ७१५०० ते ७२००० रुपयांच्या आसपास जाईल. सण आणि लग्नाच्या हंगामापूर्वी सोन्याचा भाव मागील उच्चांक ओलांडून नवीन शिखर गाठू शकतो. म्हणजेच सोन्याचा भाव ७६००० रुपयांचा मागील उच्चांक ओलांडेल, अशी अपेक्षा आहे

गणेश चतुर्थीमुळे सोन्याच्या मागणीत वाढ झालीय. मागे २५ ते ३० वर्षापूर्वी या दिवसांमध्ये होणारी सोन्याची विक्री आता होत नाही. पण यंदा लोकांच्या दागिने खरेदी करण्याची आवड आणि दर अजून वाढण्याच्या भीतीपोटी ग्राहकांनी आपलं मन मोठं करत सोन्याच्या दागिन्याची खरेदी करणं सुरू केलंय. या वर्षी २०२४ मध्ये सोन्याची विक्री मागील विक्रीप्रमाणेच होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याच्या दागिन्यांची विक्री ५० टक्क्यांनी वाढलीय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com