Pre-Bridal Skin Care Tips: पुढच्या महिन्यात लग्न आहे; सुंदर दिसण्यासाठी प्रत्येक वधूने फॉलो करा या टिप्स

Bridal Skin Care Tips: लग्नामध्ये सुंदर दिसण्यासाठी वधूने फार कष्ट न घेता लग्नाच्या दोन महिन्याआधीपासूनच दिनक्रम ठेवावे. यामध्ये चेहऱ्याची योग्य काळजी घेतली पाहिजे.
Skin Care Tips
Pre-Bridal Skin Care TipsSaam Tv

लग्नाचा दिवस प्रत्येक वधूसाठी (Bride) अत्यंत खास असतो. लग्नाच्या दिवशी हटके दिसण्यासाठी मुली बरीच मेहनत घेतात. लग्नामध्ये सुंदर दिसण्यासाठी मुली अनेक महागडी उत्पादने विकत घेतात. तर अनेक मुलींना ही उत्पादने खर्चिक असल्याने घेताही येत नाही. यासाठी आम्ही काही टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे वधूचा लग्नामधील लूक अधिकच उठून दिसेल. (Latest News Marathi)

Skin Care Tips
Flax Seeds For Skin: चेहऱ्यावरील मुरूम आणि काळे डाग 2 दिवसांतील होतील गायब, अळशीच्या बियांचा असा करा वापर

लग्नामध्ये सुंदर दिसण्यासाठी वधूने फार कष्ट न घेता लग्नाच्या दोन महिन्याआधीपासूनच दिनक्रम ठेवावे. यामध्ये चेहऱ्याची योग्य काळजी घेतली पाहिजे. मुलींनी क्लींजिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग या तीन स्टेप्स दररोज नित्यनियमाने फॉलो केल्या पाहिजेत.

प्री- ब्राइडल स्किन केअर रूटीनमध्ये मुलींनी सकस आहार घेणे महत्वाचे आहे. यामध्ये तुम्ही फळे, व्हिटॅमिन सी आणि पाले भाज्यांचा समावेश करा.

वधूने महागड्या सौंदर्य प्रसाधनापेक्षा घरगुती उपायांनी चेहऱ्याला चमक द्या. यामध्ये तुम्ही दही आणि हळदीचे फेसपॅक लावा. बेसन आणि दुधाचा फेस पॅक लावा.

त्वचेचे आरोग्याची काळजी घेण्यासाठी पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. तुमची झोप पूर्ण झाल्याने चेहऱ्याचे सौंदर्य खुलते. तसेच यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवत नाही व चेहऱ्यावर कोणतेही परिणाम दिसत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com