Jewellery Knowledge
Fashion Beauty TipsSaam TV

Fashion Beauty Tips : 'हे' ५ दागिने महिलांकडे असलेच पाहिजेत; ऑफिससह, लग्नसमारंभात तुम्हीच दिसाल उठून

Jewellery Knowledge : काही महिलांना दागिन्यांच्या फॅशनबाबत फार निट समजत नाही. त्यामुळे त्यांचा पूर्ण लूक बिघडतो. त्यामुळे आज महिलांनी कोणत्या आउटफीटवर कोणते दागिने परिधान करावे आणि कोणते दागिने महिलांकडे

लग्न समारंभ असो ऑफीस असो किंवा मग काही कार्यक्रम कोणत्याही ठिकाणी जाताना प्रत्येक महिला विविध प्रोडक्टसह मेकअप करतात आणि दागिने परिधान करतात. मात्र काही महिलांना दागिन्यांच्या फॅशनबाबत फार निट समजत नाही. त्यामुळे त्यांचा पूर्ण लूक बिघडतो. त्यामुळे आज महिलांनी कोणत्या आउटफीटवर कोणते दागिने परिधान करावे आणि कोणते दागिने महिलांकडे असणे आवश्यक आहे हे जाणून घेऊ.

Jewellery Knowledge
Beauty Hacks: स्वयंपाकघरातील हे पदार्थ उजळवेल चेहऱ्याचं सौंदर्य

घड्याळ

जर तुम्ही वर्किंग वुमन असाल तर सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे घड्याळ असलं पाहिजे. घड्याळ घातल्याने प्रोफेश्नल इंप्रेशन चांगलं राहतं. काही महिला हातात कडे किंवा बांगड्या अथवा जास्त हेवी दागिने परिधान करून ऑफिसला येतात. मात्र त्याने त्या ओव्हर करत आहेत असं वाटतं.

टिकली

प्रत्येक मुलीकडे टिकल्यांचे पाकीट असलेच पाहिजे. जेव्हा तुम्ही ट्रेडिश्नल आउटफीट वेअर करता तेव्हा टिकली लावल्याने तुमचं सौंदर्य आणखी खुलतं.

चोकर

जर तुम्ही लग्न समारंभात जात असाल तर साधे गोल दागिने परिधान करण्यापेक्षा चोकर वेअर करा. चोकर घातल्याने चेहरा आणखी आकर्षक वाटतो. तुमच्या ड्रेसप्रमाणे तुम्ही चोकरची निवड करू शकता.

मांगटीका

मांगटीका देखील लग्न समारंभात आपली शोभा वाढवतो. जर तुम्ही घागरा परिधान केला असेल तर त्यावर मांगटीका लावा. मांगटीका लावून तुम्ही अन्य कोणताही दागिना परिधान केला नाही तरी छान वाटेल.

मोत्यांचा हार

दागिन्यांमध्ये मोत्यांचा हार देखील प्रत्येक मुलीकडे असणे गरजेचं आहे. तुम्ही पारंपारीक लूकवर बारीक मोत्यांचा हार परिधान करू शकता. तर वेस्टर्न लूकवर तुम्ही मोठ्या मोत्यांचा हार परिधान करू शकता.

Jewellery Knowledge
Beauty Skin Tips : काळ्या अंडरआर्म्समुळे चार माणसांत हात वर करण्याची लाज वाटतेय? मग 'या' टिप्सने झटपट गायब होईल डार्कनेस

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com