फटाके फोडल्यानंतर डोळ्यांत जळजळ होतेय? दुर्लक्ष करू नका, नाहीतर कायमची जाईल दृष्टी

Diwali Eye Safety: दिवाळीत फटाके फोडल्यानंतर डोळ्यांत जळजळ, लालसरपणा किंवा वेदना होत आहेत का? फटाक्यांमुळे डोळ्यांना गंभीर दुखापत होऊ शकते.
Diwali Firecracker Eye Injuries: Eye Irritation, Symptoms And Safety Tips
Diwali Firecracker Eye Injuries: Eye Irritation, Symptoms And Safety Tipssaam tv
Published On: 
Summary
  • दिवाळीत फटाक्यांमुळे डोळ्यांना गंभीर दुखापत होण्याचा धोका असतो.

  • फटाक्यांची ठिणगी, राख, धूर आणि उडणारे कण डोळ्यांना इजा पोहोचवू शकतात.

  • कॉर्नियावर ओरखडे, डोळ्यांना भाजणे आणि रेटिनाला इजा होण्याची शक्यता असते.

दिवाळीच्या दिवशी लोक दिवे लावतात, घरांची सजावट करतात, मिठाईचा आस्वाद घेतात आणि फटाके फोडतात. प्रकाशाचा हा सण कुटुंबीय आणि मित्रपरिवाराला एकत्र आणतो. मात्र, या उत्साहात अनेकदा फटाक्यांमुळे उद्भवणाऱ्या धोक्यांकडे दुर्लक्ष केले जाते. दिवाळीच्या काळात होणाऱ्या फटाक्यांच्या अपघातांमध्ये डोळ्यांना गंभीर दुखापत होण्याचे प्रमाण अधिक असते.

डॉ. अग्रवालस् आय हॉस्पिटलच्या चीफ स्ट्रॅटेजी ऑफिसर आणि हेड ऑफ क्लिनिकल सर्व्हिसेस डॉ. वंदना जैन सांगतात, “दिवाळी हा आनंदाचा आणि उत्सवाचा काळ असला, तरी या उत्साहात डोळ्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करू नये. फटाक्यांमुळे होणाऱ्या डोळ्यांच्या दुखापती या किरकोळ जळजळ आणि भाजण्यापासून ते दृष्टीवर कायमस्वरूपी परिणाम करणाऱ्या गंभीर दुखापतींपर्यंत असू शकतात.

मुलांवर नेहमीच प्रौढांनी लक्ष ठेवावे, फटाके केवळ मोकळ्या जागेत फोडावेत आणि सर्वांनी सुरक्षित अंतर राखावे. डोळ्यांना दुखापत झाल्यास डोळे चोळू नयेत किंवा घरगुती उपाय करू नयेत, तर त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी. थोडीशी सावधगिरी बाळगल्यास दिवाळीचा आनंद सर्वांसाठी सुरक्षित आणि आनंददायी राहू शकतो.”

Diwali Firecracker Eye Injuries: Eye Irritation, Symptoms And Safety Tips
Fact Check: केंद्र सरकारकडून 8 हजारांचं दिवाळी गिफ्ट? अर्ज भरलेल्यांनाच मिळणार योजनेचा लाभ?

फटाक्यांमुळे होणाऱ्या डोळ्यांच्या दुखापती

डोळे हा मानवी शरीरातील अत्यंत नाजूक अवयवांपैकी एक आहे. फटाक्यांची अगदी छोटी ठिणगी किंवा कणदेखील डोळ्यांना गंभीर इजा पोहोचवू शकतो. फटाके फोडणाऱ्या व्यक्तींनाच नव्हे, तर आसपास उभ्या असलेल्या व्यक्तींनाही डोळ्यांच्या दुखापतींचा धोका असतो.

कॉर्नियावर ओरखडे :

फटाक्यांचे लहान कण, राख किंवा ठिणग्या डोळ्यांच्या पारदर्शक बाह्य पटलावर (कॉर्निया) परिणाम करू शकतात. त्यामुळे वेदना, लालसरपणा, डोळ्यांतून पाणी येणे आणि प्रकाश सहन न होणे अशी लक्षणे दिसू शकतात.

डोळ्याचा गोळा फुटणे :

फटाक्यांच्या स्फोटामुळे निर्माण होणाऱ्या तीव्र दाबामुळे डोळ्याच्या आतील संरचनेला गंभीर इजा होऊन डोळ्याचा गोळा फुटू शकतो.

Diwali Firecracker Eye Injuries: Eye Irritation, Symptoms And Safety Tips
पुणेकरांनो रस्त्यावर फटाके फोडाल तर थेट गुन्हा दाखल होणार; दिवाळीआधी पोलिसांकडून कडक इशारा

भाजल्यामुळे होणाऱ्या दुखापती :

गरम ठिणग्या किंवा ज्वालांमुळे पापण्या, पापण्यांचे केस आणि डोळ्यांच्या पृष्ठभागाला भाजण्याची इजा होऊ शकते.

कंजंक्टिव्हाला भाजल्यामुळे होणारी इजा :

उष्णता किंवा रासायनिक पदार्थांमुळे डोळ्यांच्या पांढऱ्या भागावर असलेल्या पातळ पडद्याला (कंजंक्टिव्हा) इजा होऊ शकते.

डोळ्यांत बाह्य कण जाणे :

धूळ, राख, फटाक्यांचे अवशेष किंवा स्फोटातून उडणारे कण डोळ्यांत गेल्यास जळजळ आणि इतर गंभीर नुकसान होऊ शकते.

डोळ्याच्या आतील रक्तस्राव :

फटाक्यांच्या स्फोटामुळे डोळ्यांतील नाजूक रक्तवाहिन्यांना इजा होऊन अंतर्गत रक्तस्राव होऊ शकतो.

रेटिनाला होणारी इजा :

फटाक्यांच्या तीव्र स्फोटामुळे डोळ्यांच्या रेटिनाला गंभीर नुकसान होऊ शकते. यामुळे दृष्टी धूसर होणे किंवा कायमस्वरूपी दृष्टी गमावण्याचा धोका असतो.

रासायनिक दुखापती :

जास्त रासायनिक घटक असलेल्या फटाक्यांमधील पदार्थ डोळ्यांत गेल्यास जळजळ किंवा भाजण्याची इजा होऊ शकते.

फटाक्यांमुळे डोळ्यांना दुखापत झाल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी. मात्र, दृष्टीचे संरक्षण करण्यासाठी काही प्राथमिक उपाय उपयुक्त ठरू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.