High cholesterol symptoms: ही ६ लक्षणं दिसली तर समजा शरीरात साचतंय खराब कोलेस्ट्रॉल, वेळीच टाळा हार्ट अटॅकचा धोका

High Cholesterol Warning Signs: वाढलेलं कोलेस्ट्रॉल सुरुवातीला शांतपणे शरीरावर परिणाम करतं. त्यामुळे छातीत दुखणं, थकवा, श्वास घेण्यास त्रास यांसारखी लक्षणं दुर्लक्षित करू नका. योग्य वेळी तपासणी आणि उपचार केल्यास गंभीर हृदयविकाराचा धोका टाळता येतो.
High Cholesterol Warning Signs
High Cholesterol Warning SignsSAAM TV
Published On

आजकाल अनेकांमध्ये कोलेस्ट्रॉलची समस्या वाढताना दिसतेय. केवळ प्रौढ व्यक्ती नाही तर तरूणांमध्येही ही समस्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतेय. सुरुवातीला साधा वाटणारा हा त्रास जाऊन गंभीर हार्टच्या गंभीर समस्यांचं कारण ठरू शकतो. त्यामुळे ज्यावेळी आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉल वाढतं तेव्हा शरीर काही ना काही संकेत देत असतं.

कोलेस्ट्रॉलचे दोन प्रकार असतात, यामध्ये LDL आणि HDL यांचा समावेश आहे. यापैकी LDL ला वाईट कोलेस्टेरॉल म्हटलं जातं. याचं कारण ते रक्तवाहिन्यांमध्ये साचून प्लॅक तयार करतं आणि हार्टच्या समस्यांचा धोका वाढवतं. तर HDL चांगलं कोलेस्ट्रॉल मानलं जातं.

High Cholesterol Warning Signs
Breast cancer India: महिलांनो वेळीच सावध व्हा! चुकीच्या सवयींमुळे 30 वयात वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका

रक्तात LDL कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं की हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि इतर गंभीर आजारांचा धोका वाढतो. ही समस्या अचानक वाढते आणि सुरुवातीला कोणतीही ठळक लक्षणं दिसत नाहीत. यावेळी शरीर देत असलेल्या संकेतांकडे तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे.

छातीत दुखणं

छातीत दुखणं हे वाढलेल्या कोलेस्ट्रॉलचं लक्षण आहे. जेव्हा LDL मुळे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये प्लॅक साचतो त्यामुळे अरुंद होतात. अशावेळी छातीत दडपण, जळजळ असा त्रास होतो. त्याचप्रमाणे हे दुखणं हात, मान, जबडा किंवा पाठीपर्यंत पसरू शकतं.

त्वचेवर डाग दिसणं

त्वचेवर दिसणारे पिवळसर डाग किंवा गाठी यांच्याकडे दुर्लक्ष करू नये. हे देखील उच्च कोलेस्ट्रॉलचं एक लक्षण आहे. हे डोळ्यांच्या आसपास, कोपर, गुडघे, बोटांच्या सांध्यांवर किंवा टाचांवर दिसू शकतात. शरीरात जास्त LDL साचल्यामुळे हे डाग तयार होतात. अशावेळी आहारात बदल करूनही समस्या दूर करता येते.

High Cholesterol Warning Signs
No periods after delivery: डिलिव्हरीनंतर पीरियड्स नेमके कधी सुरू होतात? डॉक्टरांनी सांगितली महत्त्वाची माहिती

श्वास घेण्यास त्रास होणं

श्वास घेण्यास त्रास होणं हाही एक संकेत असू शकतो. रक्तवाहिन्या अरुंद झाल्यामुळे हृदयाला जास्त मेहनत घ्यावी लागते. परिणामी तुमच्या शरीराला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे जिने चढताना, वेगाने चालताना किंवा अगदी झोपल्यावरही श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो.

पायात वेदना होणं

पायात वेदना किंवा आकडी येणं, ज्याला इंटरमिटंट क्लॉडिकेशन म्हणतात. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हे देखील LDL कोलेस्ट्रॉल वाढल्याचं लक्षण असू शकतं. यामध्ये चालताना पोटऱ्या, मांड्या किंवा कंबरेमध्ये वेदना होतात. हे रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे होतं आणि यामुळे चालण्याची क्षमता देखील कमी होते.

High Cholesterol Warning Signs
Irregular Menstruation: महिन्यातून दोनवेळा मासिक पाळी का येते? तज्ज्ञांनी सांगितलं किती धोकादायक असू शकते परिस्थिती

सतत थकवा जाणवणं

सतत थकवा जाणवणं हे देखील दुर्लक्षित करू नये. शरीराला पुरेशा प्रमाणात रक्तपुरवठा न झाल्यामुळे स्नायूंना आणि अवयवांना आवश्यक पोषण मिळत नाही. त्यामुळे व्यक्तीला सतत थकल्यासारखं वाटू लागतं. हा थकवा आराम करूनही कमी होत नाही.

स्मरणशक्ती कमी होणं

ज्या व्यक्तीचं वाईट कोलेस्ट्रॉल वाढलेलं असतं त्या व्यक्तीला स्मरणशक्ती कमी होणं, डोकेदुखी किंवा ‘ब्रेन फॉग’सारखी लक्षणंही दिसू शकतात. मेंदूकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे लक्ष केंद्रित करणं कठीण होतं. अशावेळी त्या व्यक्तीला चक्कर येण्याचा त्रासही होऊ शकतो.

High Cholesterol Warning Signs
Periods Sweet Cravings : पीरियड्समध्ये गोड खाण्याची इच्छा का होते? तज्ज्ञांकडून जाणून घ्या खरं कारण

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com