Periods Sweet Cravings : पीरियड्समध्ये गोड खाण्याची इच्छा का होते? तज्ज्ञांकडून जाणून घ्या खरं कारण

Shreya Maskar

मासिक पाळी

मासिक पाळीत महिलांना गोड खाण्याची खूप इच्छा होते. मात्र जास्त गोड खाणे आरोग्यास घातक ठरते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते यामागचे खरं कारण, जाणून घेऊयात.

Menstrual Cycle | pinterest

शारीरिक- मानसिक बदल

मासिक पाळीच्या काळात महिलांच्या शरीरात अनेक शारीरिक आणि मानसिक बदल होतात. गोड खाण्याची तीव्र इच्छा होणे हा त्यापैकी एक भाग आहे. मासिक पाळीच्या काळात गोड खाण्याची इच्छा होणे हे केवळ मानसिक नसून, हार्मोनल आणि शारीरिक बदलांशी देखील संबंधित आहे.

Psychological Changes | pinterest

रक्तातील साखरेची पातळी

मासिक पाळीच्या आधी आणि दरम्यान स्त्रीच्या शरीरातील प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्सची पातळी बदलते. प्रोजेस्टेरॉनची पातळी वाढल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी किंचित कमी होऊ शकते. त्यामुळे शरीर गोड पदार्थांसाठी संकेत पाठवते.

Blood Sugar Level | pinterest

मासिक पाळीच्या वेदना

मासिक पाळीदरम्यान प्रचंड वेदना होतात. पोटदुखी वाढते, कारण शरीर कॉर्टिसोल (स्ट्रेस हार्मोन) नावाचा हार्मोन वाढतो. त्यामुळे पीरियड्समध्ये शक्य तेवढे आनंदी रहा.

Menstrual Pain | pinterest

मेंदूचे कार्य

पीरियड्समध्ये 'सेरोटोनिन' (हॅप्पी हार्मोन) ची पातळी कमी होते. साखरेचे पदार्थ खाल्याने मेंदूला तात्पुरते समाधान आणि आनंद मिळतो, त्यामुळे शरीर गोड पदार्थांची मागणी करते.

Brain Function | pinterest

पोषक घटकांची कमतरता

शरीरातील मॅग्नेशियमची पातळी कमी झाल्यामुळे गोड खाण्याची इच्छा होऊ शकते. मासिक पाळीच्या काळात स्त्रीच्या शरीरातील अतिरिक्त ऊर्जा खर्च होते. गोड पदार्थ त्वरित ऊर्जा देतात आणि थकवा कमी करण्यास मदत करतात.

Nutrient | pinterest

मानसिक ताण

मासिक पाळीच्या काळात मनःस्थितीत होणारे बदल जसे की, चिंता आणि उदासी वाढते. चिडचिड होते. थकवा जाणवतो. मूड स्विंग्स होतात. अशावेळी कम्फर्ट फूड म्हणून चॉकलेट किंवा गोड खावेसे वाटते.

Mental Stress | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

disclaimer | pinterest

NEXT : औषधांना करा टाटा- बाय बाय, पीरियड्स वेळेत येण्यासाठी करा ‘हे’ सिंपल उपाय; २ दिवसांत येईल पाळी

Periods Tips | SAAM TV
येथे क्लिक करा...