

तुमचं हार्ट तुमच्या शरीरातील प्रत्येक अवयवापर्यंत रक्त पोहोचवण्याचं काम करतं. जर यात अडथळा आला तर तुमचं जगणंच धोक्यात येऊ शकतं. कारण रक्तवाहिन्या सतत सरु राहील्या तरच आपण जीवंत राहू शकतो. याला कोरोनरी हार्ट डिसीज किंवा कोरोनरी हृदयरोग म्हणतात. याकडे वेळीच लक्ष न दिल्याने हार्ट अटॅकसारख्या जीवघेणी परिस्थितीला सामोरे जावे लागते. यामध्ये शरीर अनेकदा सुरुवातीला काही संकेत देतं. हे संकेतं वेळेत ओळखलीत तर मोठा धोका टाळता येऊ शकतो.
हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा जाणवला की, सर्वात सामान्य लक्षण म्हणजे छातीत दुखतं, छातीत जळजळ होते, दडपण येतं, घट्टपणा ही धोक्याची घंटा दिसते. विशेषतः शारीरिक मेहनत किंवा तणावाच्या वेळी हा त्रास वाढतो आणि विश्रांती घेतल्यावर काहीसा कमी होतो.
रोजच्या प्रमाणे हलक्या हालचाली करतानाही दम लागतो. हेही हृदयाच्या अडथळ्याचं महत्त्वाचं लक्षण ठरू शकतं. चालताना, बोलताना किंवा जिने चढताना अचानक दम लागणं म्हणजे हृदयाला पुरेसं ऑक्सिजन मिळत नाही याचं संकेत असू शकतं. अशी लक्षणं दिसली की, लगेचच वैद्यकीय तपासणी करावी.
कोणतंही विशेष काम न करता सतत थकवा जाणवणं हेही दुर्लक्ष करण्यासारखं लक्षण नाही. शरीरातील अवयवांना आवश्यक तेवढा ऑक्सिजन मिळत नसल्यामुळे हृदयावर खूप ताण येतो आणि त्यामुळे व्यक्तीला लवकर थकवा जाणवू लागतो. हा थकवा जास्तवेळ राहतो तो हृदयाच्या रक्तवाहिन्यांतील अडथळ्याचं सुरुवातीचं चिन्ह असू शकतो.
हृदयाशी संबंधित वेदना नेहमीच छातीतच होतील असं नाही. अनेकदा ही वेदना डाव्या हातात, मानेत, जबड्यात किंवा पाठीच्या वरच्या भागात जाणवते. बरेच जण याकडे साधा हाडांचा त्रास समजून दुर्लक्ष करतात. मात्र, अशी वेदना वारंवार होत असेल किंवा अचानक वाढलेली जाणवत असेल तर ती गंभीर ठरू शकते.
काही लोकांना अचानक हृदयाचे ठोके वाढल्यासारखे वाटतात, छातीत धडधड जाणवते किंवा चक्कर येते. अशा प्रकारच्या अनियमित हृदयाच्या गतीकडे दुर्लक्ष करू नका. हे लक्षण हृदयावर वाढलेल्या ताणाचं आणि संभाव्य रक्तवाहिन्यांतील अडथळ्याचं संकेत असू शकतं.
हृदयाच्या अडथळ्याचा धोका वाढवणारे अनेक घटक आहेत. उच्च कोलेस्टेरॉल, उच्च रक्तदाब, धूम्रपान, मद्यसेवन, मधुमेह, लठ्ठपणा आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे हा धोका जास्त वाढतो. याशिवाय कुटुंबात हृदयरोगाचा इतिहास असल्यासही सावधगिरी बाळगणं आवश्यक ठरतं. त्यामुळे शरीर देत असलेल्या सुरुवातीच्या संकेतांकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणं हेच हृदय निरोगी ठेवण्यासाठी महत्त्वाचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.