Sakshi Sunil Jadhav
लग्नानंतर सासरी जाणाऱ्या नव्या नवरीसाठी साडी ही फक्त पोशाख नसून, तिच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि सौंदर्याचा महत्त्वाचा भाग असतो.
लग्नानंतरच्या रिसेप्शन, पूजाआरती किंवा खास कार्यक्रमांसाठी कांजीवरम सिल्क साडी परफेक्ट ठरते. ही साडी रॉयल आणि रिच लूक देईल.
भारतीय परंपरेत नव्या सुनेसाठी बनारसी साडी परफेक्ट असते. हेवी डिझाईन, आकर्षक रंग आणि पारंपरिक डिझाइनमुळे ही साडी नवरीवर खुलून दिसते.
हलकी, ट्रेंडी आणि एलिगंट लूक देणारी ऑर्गेंजा टिश्यू सिल्क साडी आजकाल खूप वापरली जाते.
राजस्थानी बंधेज प्रिंट साड्या नव्या नवरीवर सुंदर दिसतात. लाल किंवा गडद रंगातील बंधेज साडी धार्मिक विधींसाठी शोभून दिसेल.
घरचोला पॅटर्न असलेली बंधेज साडी पारंपरिक आणि रिच लूक देते. यावर असलेले एम्ब्रॉयडरी वर्क साडीला जास्त आकर्षक बनवते.
हिवाळ्यातील फंक्शन किंवा सायंकाळच्या कार्यक्रमांसाठी वेलवेट साडी उत्तम ठरते. गोल्डन जरी वर्क असलेली वेलवेट साडी नवरीला ग्रेसफुल लूक देते.
जयपुरी चुनरी प्रिंट साडी ही बंधेजपेक्षा थोडी वेगळी असते. याचे डिझाईन मोठे आणि ठळक असते, जे नव्या नवरीवर खूप सुंदर दिसते.
लग्नानंतर फिके रंग टाळून गुलाबी, लाल, मॅरून, हिरवा असे गडद रंग निवडावेत. हे रंग नवरीचा लूक अधिक फ्रेश आणि रिच बनवतात.