Sakshi Sunil Jadhav
डोळे चेहऱ्याचं सौंदर्य खुलवतात आणि त्या डोळ्यांना योग्य फ्रेम देण्याचं काम आयब्रो करतात. योग्य शेप असलेल्या आयब्रोमुळे चेहरा जास्त आकर्षक आणि नीटनेटका दिसतो.
योग्य आयब्रो शेपमुळे चेहऱ्याचे फीचर्स उठून दिसतात आणि लूक अधिक सुंदर होतो. दर महिन्याला पार्लरला जाणं शक्य नसेल तर, तुम्ही घरच्या घरीच आयब्रो सेट करू शकता.
सर्वप्रथम कोमट पाणी वापरून चेहरा स्वच्छ पुसून घ्या, त्यामुळे त्वचा सॉफ्ट होते.
आयब्रो ब्रश किंवा स्पूलीने आयब्रो नीट ब्रश करा, त्यामुळे एक्स्ट्रा केस स्पष्ट दिसतात.
आयब्रोजवळील स्किन टाइट धरून, चिमटीने हळूहळू एक्स्ट्रा केस काढा. वरचे लांब केस आयब्रो कात्रीने ट्रिम करा.
पुन्हा एकदा ब्रश करून पाहा. जिथे केस जास्त किंवा विस्कळीत असतील, तिथे कात्रीने नीट कट करा.
आयब्रो केल्यानंतर कॉटनच्या कपड्यात बर्फ घेऊन हलकसं रगडा, त्यामुळे जळजळ कमी होते.
चेहरा धुऊन घ्या, वॅक्स हलकं गरम करा आणि पॉप्सिकल स्टिकने आयब्रोखाली वॅक्स लावा.
वॅक्स नेहमी केस वाढण्याच्या दिशेने लावा आणि स्ट्रिप उलट दिशेने काढा. यामुळे आयब्रोला क्लीन शेप मिळतं.