Skin Care Tips: चेहऱ्यावर सिरम लावताना या चूका करु नका, अन्यथा त्वचेला होईल मोठे नुकसान

Face Syrum: तुम्ही चेहऱ्यावर फेस सीरम वापरत असाल, तर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा, योग्य काळजी न घेतल्यास फायदा होण्याऐवजी त्वचेला हानी पोहोचू शकते.
Skin Care Tips
Skin Care TipsYandex
Published On

प्रत्येकालाच आपली त्वचा नेहमी तजेलदार आणि निरोगी राहावी असे वाटते. यासाठी अनेकजण महागडे स्किनकेअर उपचार घेतात किंवा विविध सौंदर्य उत्पादने वापरतात. बाजारात उपलब्ध असलेल्या अशा उत्पादनांमध्ये फेस सीरमला विशेष महत्त्व आहे. फेस सीरम केवळ त्वचेला चमकदार बनवत नाही, तर चेहऱ्याच्या अनेक समस्या आतून दूर करण्यास मदत करते. मात्र, याचा योग्य प्रकारे वापर केला नाही तर फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते. त्यामुळे फेस सीरमचा प्रभावी आणि सुरक्षित वापर करण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे. चला जाणून घेऊया फेस सीरम कसा आणि केव्हा वापरावा, जेणेकरून त्वचेला अधिक लाभ मिळेल.

फेस सीरम वापरण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. फेसवॉशने चेहरा नीट धुतल्यास त्वचेवरील घाण, तेल आणि अशुद्धता दूर होतात, ज्यामुळे सीरम त्वचेत योग्य प्रकारे शोषले जाते. जर तुम्ही स्वच्छ न केलेल्या चेहऱ्यावर सीरम लावलात, तर त्याचा पुरेसा प्रभाव पडणार नाही आणि छिद्रांमध्ये घाण साचल्याने मुरुमांची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे फेस सीरमचा योग्य फायदा मिळवण्यासाठी आधी चेहरा नीट धुऊन कोरडा करूनच त्याचा वापर करावा.

Skin Care Tips
UTI: महिलांमध्ये यूटीआयचा त्रास का होतो? जाणून घ्या त्याच्या प्रतिबंधासाठी सोपे उपाय

फेस सीरम वापरताना स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे. घाणेरड्या हातांनी सीरम लावल्यास चेहऱ्यावर बॅक्टेरिया पसरण्याची शक्यता वाढते, ज्यामुळे त्वचेसंबंधी अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे सीरम लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावेत. तसेच, फेस सीरम टोनर लावल्यानंतर आणि मॉइश्चरायझरच्या आधी वापरणे आवश्यक आहे. हा योग्य क्रम पाळल्यास सीरम त्वचेत खोलवर शोषले जाते आणि त्याचा अधिक चांगला परिणाम दिसून येतो. जर योग्य क्रम न पाळला तर सीरमचा अपेक्षित लाभ मिळू शकत नाही.

Skin Care Tips
Basant Panchami 2025: वसंत पंचमीच्या दिवशी काय करावं आणि काय करू नये, जाणून घ्या

अनेकांना वाटते की जास्त फेस सीरम वापरल्यास त्वचा अधिक उजळ आणि चमकदार बनेल, परंतु प्रत्यक्षात तसे होत नाही. चेहऱ्यासाठी केवळ 2-3 थेंब सीरम पुरेसा असतो. जास्त प्रमाणात लावल्यास त्वचा तेलकट दिसू शकते आणि छिद्रे अडकण्याची शक्यता वाढते. काही लोक सीरम क्रीमप्रमाणे चोळून लावतात, मात्र हे टाळावे. त्याऐवजी, हलक्या हाताने टॅप करून सीरम लावल्यास तो त्वचेत अधिक चांगल्या प्रकारे शोषला जातो, ज्यामुळे त्वचेला त्याचे संपूर्ण फायदे मिळू शकतात.

Skin Care Tips
Aloe Vera: कोरफडीच्या 'या' 5 अद्भुत फायद्यांमुळे आरोग्य होईल उत्तम

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com