IVF Treatment: IVF उपचार म्हणजे वेदना आणि जुळ्या मुलांचा जन्म? उपचारांबाबतचे हे 5 गैरसमज आधी दूर करा, डॉक्टरांनी सांगितलं महत्त्वाचं सत्य!

What Is IVF Treatment: IVF उपचार वेदनादायक असतात का? IVF मुळे जुळ्या मुलांचा जन्म होतो का? या उपचारातून जन्मलेली मुले निरोगी असतात का? जाणून घ्या IVF प्रक्रियेतील आधुनिक बदल, यशाचे प्रमाण, भ्रूण गोठवण्याचे तंत्र आणि तज्ज्ञांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन.
IVF Treatment
IVF Treatmentsaam tv
Published On: 

मूल होण्यासाठी अडचणी येत असतील तर अनेक जोडपी IVF उपचारांचा पर्याय निवडतात. पण आजही IVF उपचारांबाबत लोकांच्या मनात अनेक गैरसमज आणि भीती आहेत. IVF उपचार वेदनादायक असतात या प्रक्रियेमुळे जुळ्या मुलांचा जन्म होतो किंवा या पद्धतीने जन्मलेली मुले निरोगी नसतात, असे अनेक समज समाजात आहेत. पण वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे IVF उपचारांमध्ये मोठे बदल झाले असून, ही प्रक्रिया पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित आणि रुग्णांसाठी सोयीची झाली आहे.

इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजेच IVF या प्रक्रियेत स्त्रीबीज आणि पुरुषाचे शुक्राणू यांचे शरीराच्या बाहेर फलन केले जाते. त्यातून तयार झालेला भ्रूण महिलेच्या गर्भाशयात सोडला जातो. १९७८ मध्ये जगातील पहिल्या IVF बाळाचा जन्म झाला. त्यानंतर या उपचारांमध्ये अनेक बदल झाले आहेत. भारतात सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान (ART) कायदा लागू झाल्यामुळे रुग्णांची सुरक्षितता, उपचारांबाबतची माहिती आणि संमती तसेच आरोग्यसेवेच्या दर्जाला महत्त्व मिळाले आहे.

IVF Treatment
Kidney disease diet: डाएटच्या नावाखाली आहारातील 5 पदार्थ किडनीला आतून पोखरतायत; आजच खाणं बंद करा!

जुळ्या मुलांच्या जन्माचा धोका कमी

पूर्वी गर्भधारणेची शक्यता वाढवण्यासाठी एकाच वेळी अनेक भ्रूण गर्भाशयात सोडले जात होते. त्यामुळे IVF केल्यास जुळी मुले होतात असा समज निर्माण झाला. पण आता भ्रूणांची तपासणी आणि निवड करण्याचे तंत्र सुधारलंय. त्यामुळे एका वेळी एकच भ्रूण गर्भाशयात सोडण्याच्या पद्धतीला अधिक प्राधान्य दिले जात आहे. यामुळे जुळ्या गर्भधारणेचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली असून आई आणि बाळाच्या सुरक्षिततेलाही महत्त्व मिळाले आहे.

IVF मधून जन्मलेली मुलेही निरोगी

IVF मधून जन्मलेल्या मुलांच्या आरोग्याबाबतही अनेक प्रश्न उपस्थित होतात. पण चार दशकांहून अधिक काळातील संशोधन आणि वैद्यकीय अनुभवातून IVF द्वारे जन्मलेली मुले सर्वसाधारणपणे नैसर्गिक गर्भधारणेतून जन्मलेल्या मुलांइतकीच निरोगी असल्याचं दिसून आलंय. प्रयोगशाळेतील सुधारणा आणि उपचारांवरील देखरेखीमुळे या प्रक्रियेची सुरक्षितता वाढली आहे.

Aksigen IVF च्या प्रमुख फर्टिलिटी कन्सल्टंट डॉ. उन्नती ममतोरा यांनी सांगितलं की, "IVF उपचारांचे यश केवळ आधुनिक तंत्रज्ञानावर अवलंबून नसते. महिलेचं वय, तिचा वैद्यकीय इतिहास, एकूण आरोग्य आणि कुटुंब नियोजनाची उद्दिष्टे या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या असतात. त्यामुळे प्रत्येक रुग्णाची परिस्थिती समजून घेऊन त्यानुसार उपचार ठरवणं गरजेचं आहे."

IVF Treatment
Kidney disease symptoms: किडनी निकामी होण्यापूर्वीच सावध व्हा; 'या' 3 टेस्ट देतील जीवनदान

महिलेच्या वयानुसार बदलते उपचारांचे यश

भारतीय प्रजनन उपचार केंद्रांच्या राष्ट्रीय नोंदणीतील अभ्यासानुसार, २००७ ते २००९ या काळात भ्रूण गर्भाशयात सोडल्यानंतर ४१ ते ५४ टक्के प्रकरणांमध्ये गर्भधारणा झाली होती. त्याचप्रमाणे Journal of Human Reproductive Sciences मध्ये प्रसिद्ध झालेल्या बंगळुरूमधील जवळपास २ हजार महिलांच्या अभ्यासानुसार, ३५ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या सुमारे ४७ टक्के महिलांना एका उपचार चक्रातून बाळ झाले. तर ३५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांमध्ये हे प्रमाण ३३ टक्के होते.

भ्रूणांचे निरीक्षण, जनुकीय तपासणी आणि भ्रूण गोठवून ठेवण्याच्या तंत्रामुळे उपचारांमध्ये सुधारणा झाली आहे. मात्र, प्रत्येक महिलेसाठी एकच उपचारपद्धती योग्य नसते. तिची वैद्यकीय स्थिती पाहून उपचार ठरवले जातात.

IVF Treatment
Kidney Damage Risk: निरोगी किडनीला आतून पोखरतायत या 4 सवयी; तुम्हालाही असतील तर आजच बदलून टाका

वैयक्तिक, व्यावसायिक किंवा वैद्यकीय कारणांमुळे पालकत्व पुढे ढकलणाऱ्या व्यक्तींमध्ये स्त्रीबीज किंवा भ्रूण गोठवून ठेवण्याचा पर्यायही लोकप्रिय होत आहे. त्यामुळे IVF उपचारांबाबत योग्य आणि वैज्ञानिक माहिती घेऊनच निर्णय घेणे महत्त्वाचे असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.