Kidney disease diet: डाएटच्या नावाखाली आहारातील 5 पदार्थ किडनीला आतून पोखरतायत; आजच खाणं बंद करा!

Surabhi Jayashree Jagdish

किडनीचं कार्य

किडनी रक्तातील टाकाऊ पदार्थ फिल्टर करून ते लघवीतून शरीराच्या बाहेर टाकण्यास मदत करते. शरीरातील पाण्याचे आणि आवश्यक खनिजांचं प्रमाण योग्य ठेवण्याचं कामही किडनी करते. मात्र किडनीचं काम कमी झाल्यास काही पदार्थांमधील मीठ, प्रोटीन आणि खनिजांचं जास्त प्रमाण आरोग्याच्या समस्या वाढवू शकते.

Foods to limit for kidney health | saam tv

आहारात बदल

किडनीचं काम व्यवस्थित राहावं यासाठी योग्य आहार घेणं महत्त्वाचं असतं. किडनीचा आजार असल्यास आहारात बदल केल्याने आजार वाढण्याची प्रक्रिया मंदावते. किडनीचा त्रास असलेल्या व्यक्तींनी कोणते पाच पदार्थ टाळावेत किंवा कमी खावेत, हे जाणून घेऊया.

Chronic kidney disease diet | saam tv

प्रक्रिया केलेले पदार्थ

चिप्स, डबाबंद सूप, इन्स्टंट नूडल्स, लोणचे आणि फास्ट फूड यांसारख्या पदार्थांमध्ये मिठाचं प्रमाण जास्त असतं. जास्त मीठ खाल्ल्यामुळे रक्तदाब वाढू शकतो आणि शरीरात पाणी साचू शकतं. ज्यामुळे किडनीवरील ताण वाढतो.

Kidney function | saam tv

लाल मांस

लाल मांसामध्ये प्रोटीन आणि फॉस्फरसच प्रमाण जास्त असते. किडनीचं काम कमी झाल्यास जास्त प्रोटीन खाल्ल्यामुळे रक्तात टाकाऊ पदार्थ जमा होऊ शकतात आणि किडनीला ते बाहेर टाकण्यासाठी अधिक काम करावं लागतं.

Processed foods and kidney health | saam tv

दुग्धजन्य पदार्थ

दूध, चीज आणि दही यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांमध्ये फॉस्फरस आणि पोटॅशियम असतं. किडनीचं काम कमी झाल्यास या खनिजांचं प्रमाण शरीरात वाढू शकतं आणि त्याचा हाडांच्या तसंच हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

Red meat and kidney health | saam tv

केळी

केळी, संत्री आणि अ‍ॅव्होकॅडो यांसारख्या फळांमध्ये पोटॅशियमचं प्रमाण जास्त असतं. किडनीला अतिरिक्त पोटॅशियम बाहेर टाकता आलं नाही तर रक्तातील त्याचं प्रमाण वाढून स्नायू कमकुवत होणं आणि हृदयाच्या ठोक्यांमध्ये अनियमितता होणं असे त्रास होऊ शकतात.

Protein intake in kidney disease | saam tv

कोल्डड्रिंक्स

कोलासारख्या गडद रंगाच्या कोल्डड्रिंक्समध्ये चव आणि प्रिझरव्हेशन वाढवण्यासाठी फॉस्फरसयुक्त घटक वापरले जाऊ शकतात. या घटकांमधील फॉस्फरस शरीरात सहज शोषला जातो आणि त्यामुळे रक्तातील फॉस्फरसचं प्रमाण वाढू शकतं.

Dark cola drinks | saam tv

टीप

ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Nutrition for kidney patients | saam tv

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्वयंपाकात कोणते मसाले वापरले जायचे?

ginger and garlic in Maratha food
येथे क्लिक करा