Kidney disease symptoms: किडनी निकामी होण्यापूर्वीच सावध व्हा; 'या' 3 टेस्ट देतील जीवनदान

Surabhi Jayashree Jagdish

किडनीची लक्षणं

किडनी रक्तातील घाण आणि शरीरातील अतिरिक्त पाणी गाळून बाहेर काढण्याचं काम सतत करत असते. मात्र किडनीचा आजार सुरुवातीच्या टप्प्यात असताना अनेकदा कोणतीही स्पष्ट लक्षणं दिसत नाहीत.

Kidney function test | saam tv

लक्षणं ओळखा

डोळ्यांभोवती किंवा घोट्यांजवळ सूज येणं, लघवीचं प्रमाण बदलणं आणि लघवीला फेस येणं ही किडनीच्या समस्येची काही संभाव्य लक्षणं आहेत. लघवीतून रक्त जाणं, सतत थकवा जाणवणं, मळमळणं, भूक कमी होणं अशी लक्षणंही दिसू शकतात.

Foamy urine | saam tv

रक्तदाब

उच्च रक्तदाब आणि किडनीचा आजार यांचा एकमेकांशी संबंध आहे. रक्तदाब सतत वाढलेला राहिल्यास किडनीतील रक्तवाहिन्यांचं नुकसान होऊ शकतं आणि तिचं कार्य बिघडू शकतं. किडनीचं कार्य कमी झाल्यास शरीरातील रक्तदाब वाढू शकतो.

Kidney disease and high blood pressure | saam tv

सीरम क्रिएटिनिन आणि eGFR

सीरम क्रिएटिनिन ही रक्तातील एका टाकाऊ पदार्थाची पातळी मोजणारी तपासणी आहे ज्याचा वापर किडनीचं कार्य समजून घेण्यासाठी केला जातो. या तपासणीच्या निकालावरून eGFR हा आकडा मोजला जातो. ज्यामुळे किडनी रक्तातील घाण किती चांगल्या प्रकारे गाळते याचा अंदाज येतो.

eGFR test | saam tv

युरिन अल्ब्युमिन-टू-क्रिएटिनिन रेशो (UACR)

या तपासणीसाठी लघवीचा नमुना घेतला जातो आणि त्यातील अल्ब्युमिन नावाच्या प्रोटीनचं प्रमाण तपासलं जातं. किडनी व्यवस्थित काम करत असताना हे प्रोटीन मोठ्या प्रमाणात लघवीतून बाहेर पडत नाही, त्यामुळे लघवीत अल्ब्युमिन आढळणं हे किडनीच्या नुकसानीचं लक्षण असू शकतं.

UACR test | saam tv

रक्तदाब नियमित तपासणं

किडनीच्या आरोग्याची तपासणी करताना रक्तदाब मोजणं हा एक महत्त्वाचा भाग आहे. उच्च रक्तदाबामुळे किडनीचं नुकसान होऊ शकतं. तर किडनीचे कार्य बिघडल्यामुळेही रक्तदाब वाढू शकतो.

Kidney screening | saam tv

किडनीची तपासणी किती वेळा करावी?

ज्यांना किडनीच्या आजाराचा कोणताही धोका नाही त्यांनी वय आणि आरोग्याच्या स्थितीनुसार नियमित आरोग्य तपासणीमध्ये किडनीच्या चाचण्यांचा समावेश करावा. मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, कुटुंबात किडनीच्या आजाराचा इतिहास, हृदय व रक्तवाहिन्यांचे आजार किंवा काही औषधांचा नियमित वापर करणाऱ्या व्यक्तींना अधिक वारंवार तपासणीची गरज असू शकते.

Kidney blood test | saam tv

Refrigerator placement: घरात भिंतीपासून किती अंतराच्या दूर ठेवला पाहिजे फ्रीज?

Kidney health awareness | saam tv
येथे क्लिक करा