

सोशल मीडियावर पोह्याबाबत अनेक दावे केले जातात. काही इन्फ्लुएन्सर्सच्या मते पोहे खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते. त्यामुळे डायबिटीज असलेल्या रुग्णांनी पोहे खाऊ नये असंही सांगितलं जातं. मात्र हे खरं आहे का? पोहा आरोग्यासाठी फायदेशीर आहे की नुकसानकारक? याबाबत दिल्लीतील AIIMSच्या एंडोक्रिनोलॉजी विभागाचे प्रोफेसर डॉ. राजेश खड़गावत यांनी महत्त्वाची माहिती दिलीये.
डॉ. राजेश खड़गावत सांगतात की, नाश्त्याला पोहा खाण्याची सवय असेल आणि डायबिटीजमुळे पोहा खावा की नाही, अशी भीती वाटत असेल तर घाबरण्याची गरज नाही. पोहे तांदळापासून तयार केला जातो हे खरं आहे. त्यामुळे त्यात कार्बोहायड्रेट असतात. मात्र केवळ पोहे तांदळापासून बनतात म्हणून तो आरोग्यासाठी घातक आहे, असं मानणं योग्य नाही.
पोहे हे कार्बोहायड्रेट असलेला पदार्थ आहे. मात्र पोहे खाल्ल्यानंतर लगेचच रक्तातील साखरेची पातळी खूप वाढेल, असं आवश्यक नाही.
डायबिटीज असलेल्या व्यक्तीने कोणताही कार्बोहायड्रेट असलेला पदार्थ किती प्रमाणात खाल्ला, याला खूप महत्त्व असतं. थोड्या प्रमाणात पोहे खाणं आणि मोठी प्लेटभर पोहे खाणं याचा शरीरावर सारखा परिणाम होणार नाही. त्यामुळे पोहे खाल्ल्याने रक्तातील साखर वाढणारच, असं नाही. मात्र, पोहे जास्त प्रमाणात खाणं टाळावं. तसंच दिवसातून अनेक वेळा पोहे खाण्याची सवय लावून घेऊ नये.
पोहे किती खातो यासोबतच तो तयार करताना त्यात काय घातलं जातं, हेही महत्त्वाचं आहे. पोहे बनवताना त्यात वेगवेगळ्या भाज्या आणि शेंगदाणे घालू शकता. मात्र पोह्यासोबत गोड चहा, बिस्किटं किंवा कोल्ड ड्रिंक घेणं टाळावं. पोह्यासोबत अशा पदार्थांचं सेवन केल्यास शरीरात जाणाऱ्या कर्बोदकांचं आणि साखरेचं प्रमाण वाढू शकतं.
डॉ. राजेश खड़गावत यांच्या मते, पोहे योग्य पद्धतीने तयार केले आणि मर्यादित प्रमाणात खाल्ले तर डायबिटीज असलेल्या रुग्णांसाठीही तो नाश्त्याचा एक चांगला पर्याय ठरू शकतो. संतुलित आहाराचा भाग म्हणून पोह्याचा समावेश डायबिटीज असलेल्या व्यक्तीच्या आहारात करता येतो. त्यामुळे केवळ डायबिटीज आहे म्हणून पोहा पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही. पोहा किती प्रमाणात खाता आणि त्यासोबत काय खाता, याकडे लक्ष देणं अधिक महत्त्वाचं आहे.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.