Liver problems: लघवी गडद होतेय, शौचाचा रंगही बदललाय? लिव्हर खराब होण्याचे 5 संकेत वेळीच ओळखा

Surabhi Jayashree Jagdish

लिव्हर

लिव्हर हा शरीरातील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या अवयवांपैकी एक असून तो अनेक आवश्यक शारीरिक प्रक्रियांमध्ये सहभागी असतो. पचनासाठी पित्त तयार करण्यासोबतच पोषक घटकांवर प्रक्रिया करणं आणि शरीरातील विविध पदार्थांचं चयापचय करण्याचं काम लिव्हर करतं.

Liver disease symptoms | saam tv

सुरुवातीची लक्षणं

लिव्हरशी संबंधित काही आजार सुरुवातीच्या टप्प्यात फारशी स्पष्ट लक्षणं न दाखवता वाढू शकतात. आजाराची तीव्रता वाढल्यानंतर पचनातील बदल, भूक कमी होणं, थकवा किंवा त्वचा-डोळ्यांमध्ये बदल यांसारखी लक्षणं दिसू शकतात.

Early signs of liver disease | saam tv

जेवणानंतर पोट फुगणं

जेवणानंतर वारंवार पोट फुगणं किंवा गॅसचा त्रास जाणवणं हे फॅटी लिव्हरचं लक्षण असू शकतं. लिव्हर पित्त तयार करतं आणि पचनाच्या प्रक्रियेत त्याची महत्त्वाची भूमिका असते.

Fatty liver | saam tv

पोटाच्या उजव्या वरच्या भागात जडपणा

लिव्हर हे शरीराच्या वरच्या उजव्या भागात बरगड्यांच्या खाली असतं. लिव्हरशी संबंधित काही समस्या किंवा लिव्हरचा आकार वाढल्यास या भागात जडपणा, दाब, अस्वस्थता किंवा वेदना जाणवू शकतात. हा त्रास सतत किंवा वारंवार होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य ठरतं.

Upper right abdominal pain | saam tv

त्वचा आणि डोळे पिवळे होणं

त्वचा किंवा डोळ्यांचा पांढरा भाग पिवळसर दिसणं हे कावीळचं महत्त्वाचं लक्षण आहे. शरीरात बिलीरुबिनचं प्रमाण वाढल्यास हा पिवळेपणा दिसू शकतो. त्वचा किंवा डोळे पिवळे दिसू लागल्यास त्यामागचे कारण जाणून घेण्यासाठी वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्यक आहे.

Loss of appetite | saam tv

भूक न लागणं

लिव्हरच्या काही आजारांमध्ये भूक कमी होणं किंवा अन्न खाण्याची इच्छा कमी होणं अशी लक्षणं दिसू शकतात. कोणतीही मेहनत न करता किंवा आहारातील बदल नसताना वजन सातत्याने कमी होत असेल आणि त्यासोबत इतर तक्रारीही असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Unexplained weight loss | saam tv

लघवी आणि शौचाचा रंग गडद होणं

लघवी नेहमीपेक्षा गडद पिवळी किंवा तपकिरी दिसणं हे काही लिव्हर किंवा पित्तमार्गाच्या समस्यांशी संबंधित असू शकत. तर शरीरातील पाणी कमी झाल्यामुळेही लघवी गडद होऊ शकते. पित्ताचा प्रवाह कमी झाल्यास शौचाचा रंग नेहमीपेक्षा फिकट किंवा मातीसारखा दिसू शकतो.

Yellow skin | saam tv

टीप

ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Cinnamon water: सकाळी सकाळी एक ग्लास प्या दालचिनीचं पाणी, मिळतील जबरदस्त फायदे

येथे क्लिक करा