

तुमच्या दातांमधून रक्त येतं का? रक्तस्त्रावासोबत दुर्गंधी येतं का? तसं असल्यास हे तुमच्या हिरड्यांमधील समस्येचं लक्षण असू शकतं. रक्तस्त्राव ही केवळ एक किरकोळ समस्या नाही हे अनेकदा हिरड्यांच्या आजारांचं सुरुवातीचं लक्षण असतं. बरेच लोक याकडे दुर्लक्ष करतात परंतु हे तुमच्या हिरड्यांना सूज आल्याचं किंवा संसर्ग झाल्याचं लक्षण आहे. लक्ष न दिल्यास ही समस्या हळूहळू गंभीर होऊ शकते आणि तुमचे दात कमकुवत करू शकते.
हिरड्यांमधून रक्त येण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे हिरड्यांना आलेली सूज. हे तेव्हा घडतं ज्यावेळी तुमच्या दातांवर प्लाक आणि बॅक्टेरियाचा थर जमा होतो. जर हा थर दररोज व्यवस्थित स्वच्छ केला नाही तर त्यामुळे सूज आणि रक्तस्त्राव होऊ शकतो. सुरुवातीला हे फक्त दात घासतानाच लक्षात येतं. परंतु हळूहळू ब्रश न करताही रक्तस्त्राव होऊ शकतो.
चुकीच्या पद्धतीने ब्रश करणं
अतिशय कडक ब्रश वापरणं
दातांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणं
व्हिटॅमिन सी आणि के ची कमतरता
धूम्रपान
मधुमेह आणि हार्मोनल बदल
हिरड्या लाल आणि सुजलेल्या असणं
दात संवेदनशील होणं
कधीकधी सौम्य वेदना
ही सर्व चिन्हं हिरड्यांचं इन्फेक्शन वाढत असल्याचं दर्शवतात आणि त्यावर त्वरित लक्ष देणं आवश्यक आहे.
याव्यतिरिक्त, योग्य आहार आणि जीवनशैलीने दातांच्या समस्या कमी करता येतात. आपल्या आहारात व्हिटॅमिन सी आणि के ने समृद्ध असलेले पदार्थ जसं की, संत्री, पेरू, लिंबू आणि हिरव्या भाज्या यांचा समावेश करण्याचा प्रयत्न करा. यामुळे हिरड्या मजबूत होतात. धूम्रपान आणि तंबाखूमुळे हिरड्या कमकुवत होतात ज्यामुळे रक्तस्त्राव होण्याचा धोका वाढतो.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.