Dream Meaning: स्वप्नात या 7 गोष्टी दिसतायेत? श्रीमंत होण्याचे हे आहेत संकेत, पैशाची तंगीही होणार दूर

Financial Success: स्वप्नात दिसणाऱ्या मंदिर, लक्ष्मी, कमळ, हत्ती आणि पाण्यासारख्या शुभ संकेतांमुळे तुमचे भाग्य उजळू शकते. जाणून घ्या धनलाभाचे ७ ज्योतिषीय संकेत.
dream signs of wealth
lakshmi dream meaninggoogle
Published On

सध्याच्या जीवनात प्रत्येकालाच पैसा महत्वाचा वाटतो. पैशासाठी लोक खूप मेहनत घेतात. पण काहीवेळेस कष्टाने मिळवलेला पैसा हा अडकतो. कधीकधी लोक कर्जाने हैराण होतात. अशावेळेस लोक पैशासाठी खूप धावपळ करतात. पण त्यांच्याकडे पैसा येत असेल तर काही संकेत स्वप्नात दिसतात. ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या गोष्टी स्वप्नात दिसल्याने पैसा लवकरच आपल्याकडे आकर्षित होणार? याबद्दलचे ७ संकेत सांगितले आहेत. तुम्हालाही जर पुढील ७ पैकी कोणत्याही गोष्टी स्वप्नात दिसत असतील तर तुम्ही लवकर मालामाल होणार आहात.

स्वप्नात दिसणारे ७ शुभ संकेत कोणते?

1. हिंदू धर्मानुसार, जर स्वप्नात तुम्हाला मंदिर आणि त्यावर फडकणारा झेंडा दिसत असेल, किंवा सुर्य, चंद्र दिसत असेल तर तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहात. यामध्ये कधीकधी स्वप्नात काळ्या ढगांमधून सुर्याची किरणं येताना सुद्धा दिसू शकतात.

2.जर तुमच्या स्वप्नात देवी लक्ष्मी कोणत्याही रुपात दिसत असेल तर हे अत्यंत शुभ मानलं जातं. त्यामध्ये देवीची मुर्ती, चित्र, फोटो फ्रेम किंवा साक्षात देवी दिसत असेल तर तुमच्यावर देवीची कृपा आहे. तुम्ही लवकर पैशांच्या समस्येपासून लांब जाणार आहात.

dream signs of wealth
Jio Recharge: खुशखबर! Jioचा सगळ्यात स्वस्त रिचार्ज प्लान, किंमत आणि डेटा किती? जाणून घ्या...

3. जर तुम्हाला व्यक्तीला स्वप्नात तलावात, बागेत किंवा फुलदाणीत कमळाचं फूल दिसलं तर ते येणाऱ्या चांगल्या दिवसांचं लक्षण आहे. कमळ हे देवी लक्ष्मीशी संबंधित आहे, म्हणून असं स्वप्न सूचित करते की एखादी व्यक्ती लवकरच श्रीमंत होईल.

4. स्वप्नात प्राणी आणि पक्षी पाहिल्याने अनेकदा शुभ परिणाम मिळतात. हंस, बगळे आणि मोर हे सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जातात. स्वप्नात हत्ती पाहणं हे सूचित करते की एखाद्याचे सुप्त भाग्य जागृत होणार आहे. बैल, सिंह किंवा गाय वासरु पाहणं किंवा दूध देणं हे सुद्धा भविष्यातील आर्थिक लाभाचे लक्षण मानले जाते.

5. स्वप्नात पाण्याने भरलेला घागर किंवा भांडे पाहणे अत्यंत शुभ मानले जाते. शिवाय, नदी किंवा समुद्र पाहणे किंवा स्वतःला पाण्यात पोहताना पाहणे हे सुद्धा आर्थिक प्रगती आणि संपत्ती दर्शवते.

6. सनातन परंपरेत हळदीला खूप शुभ मानले जाते. म्हणून, जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात हळद लावताना दिसले तर ते सूचित करते की त्यांना लवकरच आर्थिक लाभ होऊ शकतो.

7. याव्यतिरिक्त, स्वप्नात मधमाशी किंवा पोळा दिसणं हे प्रगती आणि अचानक संपत्तीचे प्रतीक मानले जाते. हे स्वप्न सूचित करते की तुमच्या कठोर परिश्रमाचे फळ लवकरच मिळणार आहे.


टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

dream signs of wealth
Mumbai Cherry Blossom: मुंबईतील जपानसारखी 'चेरी ब्लॉसम प्लेस' कुठे आहे? गुलाबी फुलांच्या सान्निध्यात लगेचच करा रोड ट्रिप प्लान

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com